RCB Female Fan proposing an RCB fan Boyfriend During CSK vs RCB Match esakal
IPL

RCB सोबत 'प्रामाणिक' तर मुलीशी पण प्रामाणिक' थेट स्टेडिअममध्ये प्रपोज

सकाळ डिजिटल टीम

आयपीएलच्या 15 व्या हंगामात रॉयल चॅलेंजर बेंगलोरने (Royal Challenger Bangalore) चेन्नई सुपर किंग्जला 13 धावांनी हरवले. मात्र सामना सुरू असताना एक अजब प्रकार घडला. एका आरसीबीच्या महिला चाहतीने (RCB Female Fan) सामना सुरू असतानाचा आपल्या बॉयफ्रेंडला गुडघ्यावर बसून प्रपोज (propose) केले. सहसा मुलं मुलींसमोर गुडघे टेकतात. मात्र यावेळी उलटा प्रकार घडला. मुलीने स्टँडमधून मैदानात प्रेमाचा चौकार मारला. तिने मुलाला गुडघ्यावर बसून प्रपोज केले. मुलाने देखील होकार देत रिंग बोटात घातली. सध्या सोशल मीडियावर याचा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.

या प्रेमळ घटनेचा फोटो वासिम जाफरनेही (Wasim Jaffer) शेअर केला. त्याने हा फोटो शेअर करून त्याला 'स्मार्ट मुलीने आरसीबी फॅनला प्रपोज केलं. जर तो आसीबीचा प्रामाणिक चाहता असले तर तो नक्कीच तिचा प्रामाणिक जोडीदार होणार. मस्त प्रपोज करायला चांगला दिवस निवडला.' असे कॅप्शन दिले.

रॉयल चॅलेंजर बेंगलोरने चेन्नई सुपर किंग्जचा 13 धावांनी पराभव करत चेन्नईच्या प्ले ऑफच्या स्वप्नांवर जवळपास पाणी फिरवले. आरसीबीने ठेवलेल्या 174 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला 160 धावांपर्यंतच मजल मराता आली. चेन्नईकडून डेवॉन कॉनवॉयने 56 धावांची झुंजार खेळी करत प्रतिकार केला. मात्र आरसीबीच्या फिरकी आणि वेगावान गोलंदाजांनी भेदक मारा करत सीएसकेला सातत्याने धक्के दिले. हर्षल पटेलने चांगला मारा करत 3 विकेट घेतल्या. आरसीबीकडून महिपाल लोमरोरने सर्वाधिक 42 तर कर्णधार फाफ ड्युप्लेसिसिने 38 धावा केल्या. त्यांना दिनेश कार्तिकने 17 चेंडूत 26 धावा चोपून चांगली साथ दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT