RCB Harshal Patel Says Waiting For 3 Years Bowling In Slog Overs esakal
IPL

हर्षल पटेल गेल्या तीन वर्षापासून कशाची वाट पाहत होता?

अनिरुद्ध संकपाळ

कोलकाता : रॉयल चॅलेंजर बेंगलोरचा (Royal Challenger Bangalore) वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने (Harshal Patel) स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्याबाबत आपले मत व्यक्त केले. तो म्हणाला की मला स्लॉग ओव्हरमध्ये (Slog Over) गोलंदाजी करण्यासाठी भीती वाटत नाही. उलट मी या परिस्थितीचा सामना करण्यासाठी उत्सुक असतो. मी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत हरियाणाकडून खेळताना सातत्याने स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाजी करतो. त्यावेळी मी माझ्या गोलंदाजीत विविधता आणण्याचा प्रयत्न करत असतो. लखनौ सुपर जायंट विरूद्धच्या एलिमनेटर सामन्यात त्याने स्लॉग ओव्हरमधील आपला प्रभावी मारा दाखवून दिला.

आरसीबीने लखनौ सुपर जायंटविरूद्ध (Lucknow Super Giants) मिळालेल्या 14 धावांच्या विजयानंतर हर्षल पटेल म्हणाला की, 'मी चांगली कामगिरी करू शकेन की नाही हे मला माहिती नाही. मात्र मी या दबावाच्या परिस्थितीतून सारखं सारखं जाऊ इच्छितो याबाबत कोणतीच शंका नाही.'

तो पुढे म्हणाला की, 'गेल्या दोन ते तीन वर्षापासून मी याच गोष्टीची वाट पाहत होतो. मी हरियाणासाठी शेवटच्या षटकात गोलंदाजी केली आहे. मला आता मोठ्या स्तरावरील सामन्यात शेवटच्या षटकात गोलंदाजी करायची होती. मी स्वतःला या दबावाच्या परिस्थितीत सारखे सारखे पाहू इच्छितो. कधी चांगली कामगिरी करेन तर कधी चांगली कामगिरी होणार नाही. काही सामन्यात पराभवाचा सामना देखील करावा लागले मात्र ते चालेल. फक्त आव्हानांचा सामना करण्यासाठी मी मागे हटणार नाही.;

लखनौ सुपर जायंट विरूद्धच्या सामन्यात हर्षल पटेलने दोन षटकात फक्त 8 धावा दिल्या. लखनौला 18 व्या षटकात 41 धावा हव्या होत्या. त्यावेळी क्रीजवर केएल राहुल आणि मार्कस स्टॉयनिस होते. याबाबत पटेल म्हणाला की, मी थोडा नर्वस होतो. या स्थितीत सामन्यात काहीही होऊ शकते. कोणाही नर्वस होऊ शकतो. मी विचार केला की वाईड यॉर्कर टाकून भागणार नाही. मला फलंदाजाची विकेट घेणे गरजेचे आहे. त्यानंतर स्टॉयनिस मोठा फटका मारण्याच्या नादात झेलबाद झाला. आल्या आल्या षटकार मारणाऱ्या मार्कस स्टॉयनिसला हर्षल पटेलने 17.3 षटकात बाद केले. हर्षल पटेलने आपल्या 4 षटकात 6.20 च्या सरासरीने 25 धावा दिल्या.

शेवटच्या दोन षटकात हर्षलने चांगला मारा करत लखनौवर दबाव टाकले. याबाबत लखनौचा कर्णधार केएल राहुलने स्वतः प्रेस कॉन्फरन्समध्ये वक्तव्य केले. राहुल म्हणाला की, 'आम्ही चौकार षटकार मारण्याचा प्रयत्न केला नाही असे नाही. मात्र मधल्या षटकात त्यांनी चांगली गोलंदाजी केली. हर्षल पटेलने आपल्या शेवटच्या दोन षटकात आमच्यावर दबाव वाढवला. त्याने दोन षटकात फक्त 8 धावा दिल्या.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wimbledon 2025 Final: यानिक सिनरने वचपा काढला,अल्काराजला हरवत जिंकलं विम्बल्डनचं विजेतेपद

ENG vs IND: भारतासमोर सोप्पं लक्ष्य, पण इंग्लंडनेही कसली कंबर; 3rd Test जिंकण्यासाठी शेवटच्या दिवसाचं कसं समीकरण?

शाळा ५ किमी अंतरावर असेल तर विद्यार्थ्याला ६००० रुपये मिळणार, सरकारची मोठी घोषणा, योजनेचा लाभ कसा मिळवायचा?

Mumbai News: रेल्वेतच महिलेला प्रसुतीकळा, खाकी वर्दीतल्या देवदूताची धाव; माय लेकाचा वाचवला जीव

Mhada Lottery: म्हाडाला लागणार घरांची लाॅटरी, सर्वसामान्य मुंबईकरांचं होणार स्वप्नपूर्ण; पहा कधी निघणार सोडत?

SCROLL FOR NEXT