sakal
sakal 
IPL

चेन्नईचा विजयपथ कायम राहणार?; चौथा पराभव टाळण्याचे बंगळूरसमोर आव्हान

सकाळ वृत्तसेवा

IPL 2022 : पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळूर व चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यामध्ये हा सामना होणार आहे. दोन्ही संघांसाठी ही लढत अत्यंत महत्त्वाची असणार आहे. फाफ ड्युप्लेसिसच्या बंगळूर संघाला या वेळी सलग चौथा पराभव टाळायचा आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपरकिंग्जला विजयी पथावर कायम राहायचे आहे. याआधी दोन संघांमध्ये झालेल्या लढतीत चेन्नई सुपरकिंग्जने विजय मिळवला होता.

बंगळूर संघाने आतापर्यंत १० सामन्यांमधून ५ सामन्यांमध्ये विजय मिळवले आहेत. यापुढील चारही लढती या संघासाठी निर्णायक ठरणार आहेत. या संघातील फलंदाजांनी आतापर्यंत फक्त ७ अर्धशतके झळकावली आहेत. प्रमुख खेळाडू विराट कोहली याने गुजरात टायटन्सविरुद्धच्या लढतीत अर्धशतकी खेळी साकारली. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने सुटकेचा नि:श्‍वास टाकला असेल; पण तरीही त्याच्यासह ड्युप्लेसिस, रजत पटीदार, ग्लेन मॅक्सवेल यांनीही आपली जबाबदारी ओळखून खेळ करायला हवा. दिनेश कार्तिक फिनीशर म्हणून आपली कामगिरी चोख बजावत आहे.

सातत्याचा आभाव

रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघातील गोलंदाजांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव दिसून येत आहे. वनिंदू हसरंगाने १५ फलंदाज बाद केले असून, वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने १० व हर्षल पटेलने १० फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे. मोहम्मद सिराजने ८ फलंदाज बाद केले आहेत. मात्र महम्मद सिराजच्या कामगिरीत चढउतार प्रकर्षाने दिसून येतो. शाहबाज अहमद व तडाखेबंद फलंदाज ग्लेन मॅक्सवेल यांनाही आतापर्यंत म्हणावी तशी कामगिरी करता आलेली नाही.

धोनीचे नेतृत्व व ॠतुराजमध्ये बदल

जडेजाने चेन्नई संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर झालेल्या लढतीत धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने हैदराबादवर विजय मिळवला. या लढतीत ऋतुराज गायकवाड (९९ धावा) व डेव्होन कॉनवे (नाबाद ८५) या दोघांनी चमकदार कामगिरी केली. धोनीच्या नेतृत्वात ऋतुराजचा खेळ बहरतो. याची झलक मागील मोसमात पाहायला मिळाली आहे. यापूर्वी ऋतुराज अपयशी ठरला होता.

धावा देण्याची सरासरी जास्तच

चेन्नई संघातील गोलंदाजांना या मोसमात धमक दाखवता आलेली नाही. याच कारणामुळे गोलंदाजांचा इकॉनॉमी रेट (धावा देण्याची सरासरी) ७.५४ च्या वर आहे. फिरकी गोलंदाज माहीश थिकशाना याने ७.५४ च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी केली आहे. इतर गोलंदाजांची इकॉनॉमी जास्त आहे. ड्वेन ब्राव्हो (१४ बळी), मुकेश चौधरी (११), जडेजा (५) या सर्वांना सुधारणा करावी लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR Live IPL 2024 : सूर्यकुमार यादवचं अर्धशतक, मुंबईनेही मारली शतकी मजल

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT