Rilee Rossouw PBKS vs DC  esakal
IPL

Rilee Rossouw PBKS vs DC : पृथ्वी, वॉर्नरची अर्धशतके तर रूसोने पंजाबला दिले तडाखे, प्ले ऑफचा मार्ग केला खडतर

अनिरुद्ध संकपाळ

Rilee Rossouw PBKS vs DC : दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जचे प्ले ऑफमध्ये जाण्याचा मार्ग खडतर केला आहे. नाणफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या पंजाबच्या गोलंदाजांची दिल्लीच्या पहिल्या तीन फलंदाजांनीच चिंधड्या उडवल्या. सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने 46, पृथ्वी शॉने 54 तर रिली रूसोने नाबाद 82 धावांची खेळी केली. यामुळे दिल्ली पंजाबसमोर 214 धावांचे आव्हान ठेवू शकली.

पंजाबने दिल्लीला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केल्यानंतर दिल्लीच्या सलामीवीरांनी दमदार सुरूवात केली. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ यांनी दिल्लीला 6 षटकात 61 धावांपर्यंत पोहचवले. पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वॉर्नर या दोघांनी आक्रमक फलंदाजी करण्यास सुरूवात केली.

पॉवर प्लेमध्ये दमदार सुरूवात करून दिल्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ यांनी आपला धडाका कायम ठेवत दिल्लीला 10 षटकात 93 धावांपर्यंत पोहचवले. दरम्यान दोघेही आपल्या अर्धशतकाजवळ पोहचले होते. मात्र सॅम करनने डेव्हिड वॉर्नरला 46 धावांवर बाद केले.

वॉर्नर बाद झाल्यानंतर आलेल्या रिली रूसोने पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक फटकेबाजी करण्यास सुरूवात केली. दरम्यान, सलामीवीर पृथ्वी शॉने आपले हंगामातील अर्धशतक पूर्ण केले. मात्र सॅम करनने त्याला धावांवर बाद करत दिल्लीला दुसरा धक्का दिला. या धक्क्याचा दिल्लीच्या रूसोवर काही परिणाम झाला नाही.

त्याने आपला दांडपट्टा सुरूच ठेवत 25 चेंडूत अर्धशतक ठोकले. हे त्याचे हंगामातील पहिले अर्धशतक ठरले. यानंतरही रूसो थांबला नाही त्याने 37 चेंडूत नाबाद 82 धावांची खेळी करत दिल्लीला 200 धावांचा टप्पा पार करून दिला. त्याला सॉल्टने 14 चेंडूत 26 धावा करून चांगली साथ दिली. पंजाबकडून सॅम करनने दोन विकेट्स घेतल्या.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

SCROLL FOR NEXT