Rinku Singh IPL Team India Selection esakal
IPL

Rinku Singh IPL : भारतीय संघातील निवडीबाबतच्या प्रश्नाला रिंकूने दिले 'एकदम कडक' उत्तर, म्हणाला...

अनिरुद्ध संकपाळ

Rinku Singh IPL Team India Selection : आयपीएलचा प्रत्येक हंगाम हा भारतीय क्रिकेटला एकतरी दर्जेदार खेळाडू देऊन जातो. यंदाच्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सचा मधल्या फळीतील डावखुरा फलंदाज रिंकू सिंहची जोरदार चर्चा आहे. त्याने यंदाच्या हंगामात अनेक सामन्यात मॅच फिनिशरची भुमिका चोखपणे निभावली त्याने केकेआरला विजयासाठी 29 धावांची गरज असताना शेवटच्या षटकात पाच षटकार ठोकत सामना जिंकून दिला होता.

आता नुकत्याच झालेल्या लखनौ सुपर जायंट्स विरूद्धच्या सामन्यात रिंकू सिंहने शेवटच्या 3 चेंडूत 18 धावांची गरज असताना दोन षटकार आणि एक चौकार मारला. जरी लखनौने सामना 1 धावेने जिंकला असला तरी चर्चा मात्र रिंकू सिंहचीच होती.

दरम्यान, सामना झाल्यानंतर पत्रकार परिषदेत रिंकूला अनेक प्रश्न विचारण्यात आले. यावेळी त्याला भारतीय संघात निवड होण्याबाबत काय विचार करतोयस असा प्रश्न विचारला. यावर रिंकू सिंहने अत्यंत साधे मात्र एकदम कडक उत्तर दिले.

रिंकू म्हणाला, 'प्रत्येकाला त्याचा हंगाम चांगला गेला की छान वाटतंय. मला देखील छान वाटतंय. मला खूप आनंद होत आहे. मात्र मी माझी भारतीय संघात निवड होईल असा विचार करत नाहीये. मी आता घरी जाणार आणि माझा जो सराव आहे तो सुरू करणार. जीम सुरू करणार. मी तेच करणार जे मी आधी करत होतो. संघात नाव तर येत जात राहतं. जे माझं काम आहे ते मी करतोय.'

रिंकू पुढे म्हणाला की, 'घरचे सर्व खूप खूष आहेत. बऱ्याच गोष्टी सरळ झाल्या आहेत. लोकं ओळखत होते. मात्र पाच षटकार मारल्यानंतर सर्वात जास्त सन्मान मिळत आहे. खूप लोकं ओळखत आहेत.' रिंकूला त्याला हंगामातील सर्वात अवघड गोलंदाज कोणता वाटला असा प्रश्न विचारण्यात आल्यावर रिंकूने मला असा कोणताच गोलंदाज फलंदाजी करण्यास अवघड वाटला नाही असे उत्तर दिले. तोही गोलंदाज आहे मी देखील फलंदाज आहे. यासाठीच मी क्रिकेट खेळतोय. जो गोलंदाज असतो त्याची तयारी करतो. नेटमध्ये सराव करतो त्यामुळे कोणीही डेंजर वाटत नाही.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Blood Donation Recovery: रक्तदान केल्यानंतर शरीरात कोणते बदल होतात? शरीर कसं रिकव्हर होतं? ‘या’ 3 गोष्टी ठेवा लक्षात

Illegal Sand Mafia Attack: अंबडमध्ये अवैध वाळू उपशावर कारवाईला गेलेल्या तहसीलदारांसह महसूल पथकाला वाळू माफियांची मारहाण; हायवा ट्रक धडक देत पळवले

SCROLL FOR NEXT