Rinku Singh KKR vs LSG
Rinku Singh KKR vs LSG  esakal
IPL

Rinku Singh KKR vs LSG : रिंकू लढला! केकेआरचा शेवटच्या षटकातील चमत्कार अवघ्या 1 धावेने हुकला

अनिरुद्ध संकपाळ

Rinku Singh Kolkata Knight Riders vs Lucknow Super Giants : रिंकू सिंहने पुन्हा एकदा शेवटच्या षटकात धमाका केला. मात्र यावेळी केकेआरला हा धमाका विजय मिळवून देऊ शकला नाही. जरी केकेआर हरले असले तरी भारतीय क्रिकेटला एक नवा मॅच फिनिशन नक्की मिळाला आहे. रिंकूने शेवटच्या षटकातील शेवटच्या 3 चेंडूवर 18 धावांची गरज असताना दोन षटकार आणि एक चौकार मारत 16 धावा केल्या. लखनौने फक्त 1 धावेच्या जिवावर प्ले ऑफ गाठले. रिंकू सिंहने 33 चेंडूत 66 धावा ठोकत सामना शेवटच्या चेंडूपर्यंत नेला. लखनौकडून रवी बिश्नोईने 23 धावा देत 2 बळी टिपले.

लखनौने या एका धावेच्या विजयामुळे 17 गुणांसह आपले प्ले ऑफचे तिकीट पक्के केले. मात्र क्रुणाल पांड्याचे भाऊ हार्दिक पांड्याला थेट भिडण्याचे स्वप्न भंगले. कारण सरस नेट रनरेटच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्ज गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर राहिले असून तिसऱ्या स्थानावर असलेल्या लखनौला आता इलिमनेटर सामना खेळावा लागणार आहे.

लखनौचे 177 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या केकेआरच्या सलामीवीरांनी पॉवर प्लेमध्येच 61 धावा ठोकल्या. जेसन रॉय आणि व्यंकटेश अय्यरने नवीन चेंडू आणि पॉवर प्लेचा चांगलाच फायदा उचलला. मात्र त्यानंतर लखनौने केकेआरच्या फलंदाजीला खिंडार पाडायला सुरूवात केली. पॉवर प्ले संपता संपता व्यंकटेश अय्यर 24 धावा करून बाद झाला.

त्यानंतर आलेला कर्णधार नितीश राणाने 10 चेंडूत 8 धावा केल्या आणि तो रवी बिश्नोईची शिकार झाला. दरम्यान 25 चेंडूत 45 धावा करणारा जेसन लखनौसाठी डोकेदुखी ठरत होता. मात्र कर्णधार क्रुणाल पांड्याने त्याचा 10 व्या षटकात त्रिफळा उडवत केकेआरला मोठा धक्का दिला.

रिंकू सिंह केकेआरला या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच रहमनुल्ला गुरबाज 15 चेंडूत 10 धावा करून माघारी परतला. रिंकू सिंह एका बाजूने एकटा लढत असताना आंद्रे रसेल 7, शार्दुल ठाकूर 3 तर सुनिल नरेन 1 धाव करून बाद झाले. आता सामना केकेआरच्या हातून निसटला असतानाच रिंकू सिंहने फटकेबाजी करत अर्धशतक ठोकले अन् सामना 6 चेंडूत 21 धावा असा आणला.

रिंकूने याच हंगामात शेवटच्या षटकात 29 धावा हव्या असताना सामना जिंकून दिला होता. त्यामुळे रिंकूकडून अपेक्षा होत्या. मात्र रिंकूला पहिल्या तीन षटकात 2 धावाच करता आल्या. आता सामना 3 चेंडूत 19 धावा असा आला. मात्र शेवटचे षटक टाकणाऱ्या यश ठाकूरने वाईड बॉल टाकत सामना 3 चेंडू 18 धावा असा आणला. रिंकूने पुढच्याच चेंडूवर षटकार ठोकत सामना 2 चेंडूत 12 धावा असा आणला.

सामना जिंकायला दोन षटकारांची गरज असताना पाचव्या चेंडूवर यश ठाकूरने चौकार दिला. त्यामुळे सामना एक चेंडू आणि 8 धावा असा आला. सामना केकेआरच्या हातून निसटला होता. मात्र रिंकूने षटकार मारत लखनौचा विजय फक्त 1 धावेपुरता ठेवला.

(Sports Latest News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT