IPL 2024 Rishabh Pant Angry RR vs DC News Marathi sakal
IPL

IPL 2024 : RR विरुद्धच्या पराभवानंतर ऋषभ पंतचा संयम सुटला! रागाच्या भरात भिंतीवर... Viral Video

Rajasthan Royals vs Delhi Capitals Rishabh Pant Angry : राजस्थान रॉयल्सला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला.

Kiran Mahanavar

Rajasthan Royals vs Delhi Capitals Rishabh Pant Angry :

राजस्थान रॉयल्सला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. दिल्लीचा हा सलग दुसरा पराभव आहे. पहिल्या सामन्यातही ऋषभ पंतचा संघ डीसी पंजाब किंग्जविरुद्ध 4 विकेटने पराभूत झाला होता. यानंतर आता राजस्थानविरुद्ध 12 धावांनी दारूण पराभव झाला आहे.

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत 26 चेंडूत 28 धावा करून आऊट झाला. पण बाद झाल्यानंतर त्याचा संयम सुटला. दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधाराने रागाच्या भरात भिंतीवर बॅट मारली. खरं तर, ऋषभ पंत आऊट झाल्यानंतर स्वतःवर खूप नाराज दिसत होता.

ऋषभ पंत युझवेंद्र चहलच्या चेंडूवर आऊट झाला. त्यावेळी दिल्ली कॅपिटल्सची धावसंख्या 13.1 षटकात 4 विकेट गमावत 105 धावा होती, पण पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर ऋषभ पंत चांगलाच संतापलेला दिसत होता.

दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधाराने रागाच्या भरात आपली बॅट भिंतीवर मारली. मात्र, ऋषभ पंतचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पंतची ही प्रतिक्रिया पाहून चाहतेही त्याच्यावर नाराज झाले आहेत.

या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या राजस्थान रॉयल्सने 20 षटकात 5 गडी गमावून 185 धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सचा संघ 20 षटकांत 5 गडी गमावून 173 धावाच करू शकला. दिल्ली कॅपिटल्ससाठी सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने 34 चेंडूत सर्वाधिक 49 धावा केल्या. तर ट्रिस्टन स्टब्सने 23 चेंडूत 44 धावांची खेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार; पुणे,साताऱ्यासह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट, तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Landowners Compensation Hike: जमीनमालकांसाठी नुकसानभरपाईत वाढ, ४० वर्षांनंतर उच्च न्यायालयाचा निर्णय

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

आजचे राशिभविष्य - 16 ऑगस्ट 2026

Aries Weekly Horoscope: मेष राशीसाठी मोठी खुशखबर! जुने वाद मिटणार, नवी दारे उघडणार; 'या' दिवसांत मिळेल भाग्याची साथ

SCROLL FOR NEXT