Rishabh Pant Girlfriend Isha Negi sakal
IPL

वहिनीसाहेब आल्या, दिल्ली कॅपिटल्सचं नशीब घेऊन

ऋषभ पंतची गर्लफ्रेंड ईशा नेगी दिल्ली कॅपिटल्सची मॅच पाहण्यासाठी आले, चाहते म्हणाले – वहिनी आली, नशीब घेऊन

Kiran Mahanavar

Rishabh Pant Girlfriend Isha Negi: दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) आयपीएलच्या 41 व्या सामन्यात आमने-सामने होते. मुंबईतील वानखेडे मैदानावर हा सामना सुरू होण्यापूर्वीच सोशल मीडियावर एक फोटो प्रचंड व्हायरल होत होता. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतची गर्लफ्रेंड ईशा नेगी (Isha Negi) आणि त्याची बहीण साक्षी हा सामना पाहण्यासाठी आली होती. सामना सुरू झाला तेव्हा टीव्ही स्क्रीनवर दोघेही दिसल्या होत्या. ईशा नेगी आणि साक्षी पंत स्टँडवर एकत्र बसून एकमेकींशी गप्पा मारत होत्या. यानंतर दिल्ली कॅपिटल्सला सुरुवातीला यश मिळाल्यावर ईशा आनंदाने उड्या मारताना ना तिचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका यूजरने लिहिले आहे की, वहिनीबाई आली नशीब घेऊन.(Rishabh Pant Girlfriend Isha Negi)

ऋषभ पंतची गर्लफ्रेंड ईशा नेगी व्यावसायिक डिझायनर आहे. ऋषभ पंत आणि ईशा नेगी पाच वर्षांहून अधिक काळ डेट करत आहे. 2020 च्या सुरुवातीला ऋषभ पंतने सोशल मीडियावर ईशा नेगीसोबतचा एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोच्या माध्यमातून पंतने सर्व जगासमोर खुलेपणाने आपले प्रेम व्यक्त केले होते. त्याचबरोबर ऋषभ पंतने गेल्या काही वर्षांत आपल्या फलंदाजीने सर्वांची मने जिंकली आहे. सध्या तो टीम इंडियाचा नंबर वन यष्टिरक्षक फलंदाज आहे आणि तो तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताकडून खेळ आहे. आयपीएल 2022 मध्ये तो दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आहे.

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) 20 षटकांत 9 गडी बाद 146 धावा केल्या. नितीश राणाने 34 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 57 धावांची खेळी केली. याशिवाय श्रेयस अय्यरने 42 आणि रिंकू सिंगने 23 धावांचे योगदान दिले. दिल्ली कॅपिटल्ससाठी, कुलदीप यादवकडे सर्वाधिक चार आणि मुस्तफिझूर रहमानकडे तीन खेळाडू होते. प्रत्युत्तरात दिल्लीने सहा चेंडू राखून 150/4 धावा करून विजय मिळवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

BCCI ची अब्जावधींची कमाई होते तरी कशी? भारताच्या तुलनेत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड किती कमावतो पैसा, जाणून घ्या

Latest Marathi News Updates : गावातील रस्त्याना आले नदीचे स्वरूप

Pune Crime : ‘एनएचएम’ मधील अधिकारी कर्मचाऱ्यांना कोटयावधींचा गंडा; नोकरीत कायम करण्‍याच्‍या नावाखाली उकळले ७५ कोटी

Pakistan admits: मोठी बातमी! अखेर पाकिस्तानला कबूल करावंच लागलं ; 'अमेरिकेच्या मध्यस्थीसाठी कधीच तयार नव्हता भारत'

SCROLL FOR NEXT