Rishabh Pant Six Video Shah Rukh Khan Also Appreciated esakal
IPL

Rishabh Pant DC vs KKR : कहीं पे निगाहें कहीं पे निशाना... पंतचा भन्नट सिक्सर पाहून किंग खानही जागेवरून उठला

अनिरुद्ध संकपाळ

Rishabh Pant Six Video Shah Rukh Khan Also Appreciated DC vs KKR IPL 2024 : कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध 273 धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर दिल्लीची अवस्था 4 षटकात 4 बाद 33 धावा अशी केली होती. मात्र दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने हत्यार टाकण्यास नकार दिला.

त्यानं ट्रिस्टन स्टब्जसोबत पाचव्या विकेटसाठी 93 धावांची धडाकेबाज भागीदारी रचत दिल्लीची होम ग्राऊंडवर लाज वाचवली. पंतने 25 चेंडूत 55 धावांची धडाकेबाज खेळी केली. यावेळी त्याने एक असा भन्नाट षटकार मारला की किंग खान शाहरूखने देखील आपल्या खुर्चीतून उठून पंतसाठी टाळ्या वाजवल्या.

केकेआरने विजयासाठी 273 धावांचे आव्हान ठेवल्यानंतर दिल्लीने आक्रमक सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वॉर्नर यांनी 2 षटकात 21 धावा करत चांगली सुरूवात दिली. मात्र वैभव अरोरा आणि मिचेल स्टार्क यांनी दिल्लीला पाठोपाठ धक्के देत सामन्याचं पारडं केकेआरच्या बाजूनं झुकवलं.

अखेर आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू स्टार्कने तिसऱ्या सामन्यात विकेट्सचं खातं उघडलं. त्यानं दोन कांगारू टिपले. स्टार्कने डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांची विकेट घेतली. तर वैभव अरोराने पृथ्वी शॉ आणि पोरेलला बाद करत दिल्लीची अवस्था बिनबाद 21 धावांवरून 4 बाद 33 धावा अशी केली.

दिल्लीने पॉवर प्लेमध्येच नांगी टाकली असं वाटलं. मात्र कर्णधार ऋषभ पंत आणि स्ट्रिस्टन स्टब्ज यांनी काऊंटर अटॅक करत सामन्यात जीव ओतण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी रचली. पंतने तर षटकारांचा पाऊस पाडला. त्याने 5 षटकार आणि 4 चौकार मारत आपल्या 55 धावांच्या खेळीतील 46 धावा या चौकार अन् षटकारांनीच पूर्ण केल्या.

स्टब्जने देखील 54 धावांची अर्धशतकी खेळी केली. मात्र या दोन अर्धशतकी खेळी सोडल्या तर दिल्लीकडून इतर फलंदाजांनी फारशी चमक दाखवली नाही. वरूण चक्रवर्तीने ऋषभ पंत अन् स्टब्जला बाद करत दिल्लीची झुंज संपवली. अखेर दिल्लीचा डाव 17.2 षटकात 166 धावात संपुष्टात आला.

(IPL Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT