Rohit Sharma Dressing Room speech Video IPL 2024 esakal
IPL

Rohit SharmaIPL 2024 : ...याच्याबद्दलच तर बोलत होतो; MI चं नेतृत्व करतयं तरी कोण? रोहितचा 'तो' VIDEO व्हायरल

अनिरुद्ध संकपाळ

Rohit Sharma Dressing Room speech Video IPL 2024 : रोहित शर्मा हा आता मुंबई इंडियन्सचा कर्णधार नाहीये. मुंबईच्या चाहत्यांना हे पचवणं अजून जड जात असलं तरी ते सत्य आहे. मात्र जरी रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा कर्णधार नसला तरी तो त्यांचा लिडर मात्र नक्कीच आहे. मुंबईने यंदाच्या हंगामात सलग तीन पराभवानंतर विजयाची चव चाखली. होम ग्राऊंडवर दिल्ली कॅपिटल्सचा 29 धावांनी पराभव केला.

या विजयात रोहित शर्माने 49 धावांची खेळी करत सिंहचा वाटा उचलला. सामना झाल्यानंतर मुंबईच्या ड्रेसिंग रूममध्ये या कामगिरीसाठी रोहित शर्माचं कौतुक करण्यात आलं. त्यावेळी रोहित शर्माने एक छोटं मात्र दमदार भाषण देत मुंबई इंडियन्सचा तो कर्णधार नसला तरी तो लिडर मात्र आहे हे दाखवून दिलं.

रोहित शर्माने दिल्ली कॅपिटल्सविरूद्धच्या सामन्यात 27 चेंडूत 49 धावांची खेळी केली. त्याने इशान किशनसोबत 7 षटकातच 80 धावांची सलामी दिली. या पायावर रोमारियो शेफर्ड आणि टीम डेव्हिड यांनी कळस रचत दिल्लीसमोर 234 धावांचे मोठे आव्हान ठेवले. मात्र दिल्लीने सगळा जोर लावून देखील त्यांना 205 धावांपर्यंतच मजल मारता आली.

सामना झाल्यानंतर मार्क बाऊचरनं ड्रेसिंग रूममध्ये रोहित शर्माचं कौतुक केलं. त्याला कायरन पोलार्डकडून बॅज देण्यात आला. यानंतर रोहितनं ड्रेसिंग रूमला संबोधित केलं.

रोहित म्हणाला, 'मला वाटतं की आपण फलंदाजीत चांगली कामगिरी केली. आपण अशाच प्रकारची कामगिरी करण्याचा पहिल्या सामन्यापासून प्रयत्न करत होतो. आपण वैयक्तिक कामगिरीपेक्षा संपूर्ण संघानं कामगिरी केलं तर आपण सांघिक गोल साध्य करू शकतो.'

'आपण अशाच कामगिरीबाबत गेल्या अनेक दिवसांपासून बोलत आहोत. हीच कामगिरी बॅटिंग कोच, मार्क आणि कर्णधाराला अपेक्षित आहे.' रोहितच्या या छोटेखानी भाषणानंतर ड्रेसिंग रूममधील सगळ्या खेळाडूंनी जोरादर टाळ्या वाजवल्या.

(IPL Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM 1st T20I: गौतम गंभीर भारतीय संघासोबत झिम्बाब्वेत का नाही? मुख्य प्रशिक्षक मग कोण? BCCI ने घेतला निर्णय

Anna Hazare: विद्यार्थ्यांसाठी मूक आंदोलन पुकारलं; अण्णा हजारेंना रडू कोसळलं, भावनिक व्हिडिओ व्हायरल, कारण काय?

Mumbai Pollution: पृथ्वीला प्रदूषणाचा विळखा, पीओपी बंदीचे समर्थन; याचिकाकर्त्यांचा न्यायालयात युक्तिवाद

Latest Marathi Update : सोनम वांगचुक यांना दिले जाणारे सर्व उपचार त्यांच्या संमतीनेच केले जात आहेत - मेदान्ता रुग्णालय

Indigenous Rice Aambegaon: आंबेगावात दुर्मिळ देशी भात वाण संवर्धनासाठी लागवड प्रात्यक्षिक; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

SCROLL FOR NEXT