Rohit Sharma MI vs KKR  esakal
IPL

Rohit Sharma MI vs KKR : रोहितने पोटदुखीचे कारण देत अर्जुनला घातली 'मानाची' टोपी!

अनिरुद्ध संकपाळ

Rohit Sharma Arjun Tendulkar MI vs KKR : मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईकडून रोहित शर्माने नाणेफेक जिंकली असेल असे आपल्याला वाटत असेल. मात्र तसं झालं नाही. नाणेफेकीसाठी रोहित शर्माची वाट पाहत असताना अचानक सूर्यकुमार यादव मैदानात आला. यामुळे सर्वांनाच धक्का बसला. कारण रोहित शर्मा गेल्या सामन्यात दुखापतग्रस्त झालाय असे ऐकण्यात आले नव्हते.

अखेर नाणेफेकीवेळी रोहित शर्मा ऐवजी सूर्यकुमार यादव का आला याचा उलगडा खुद्द सूर्यानेच केला. रोहितच्या पोटात काहीतरी गडबड झाली असल्याने त्याच्या ऐवजी मी नाणेफेकीसाठी आलोय असे सूर्याने सांगितले. याचदरम्यान, रोहित शर्मा मुंबई इंडियन्सच्या टीम मिटिंगवेळी अर्जुन तेंडुलकरला पदार्पणाची मानाची कॅप घालत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर रोहित शर्माची पोटदुखी किती गंभीर आहे हे समजले.

अर्जुन तेंडुलकरने आयपीएल पदार्पण केले. त्यासाठी रोहित शर्माने स्वतः राखीव खेळाडू म्हणून संघाबाहेर राहणे पसंत केले. याचा अर्थ रोहित शर्मा आजच्या सामन्यात फलंदाजी करू शकतो त्याला फिल्डिंगसाठी मौदानात उतरण्याची गरज नाही. रोहितच्या या निर्णयामुळे मुंबईच्या बॅटिंगची डेप्थ वाढणार आहे. तो पियुष चावलाला बदलून स्वतः फलंदाजीला येऊ शकतो. फक्त रोहितला आजच्या सामन्यात संघाचे नेतृत्व करता येणार नाही.

मुंबईने या बदलाबरोबरच टीम डेव्हिड आणि डुआन जेनसेन यांना देखील प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळाले आहे. डुआन जेनसेन हा मार्को जेनसेनचा जुळा भाऊ असून तो देखील डाव्या हाताने गोलंदाजी करतो.

(Sports Latets News)

हेही वाचा : What is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

SCROLL FOR NEXT