RCB Fans Girl With Banner esakal
IPL

RCB Fans Girl With Banner : ही पोरगी आरसीबी IPL जिंकल्याशिवाय काही शाळेला जात नाही

अनिरुद्ध संकपाळ

RCB Fans Girl With Banner : आयपीएल आणि चाहत्यांचे एक वेगळे नाते आहे. मैदानावरील कॅमेरामनने कॅमेरा पॅन केला की त्या फ्रेममध्ये दिसण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडत असते. काही हुशार चाहते कॅमेरामनचे लक्ष वेधण्यासाठी वेगवेगळे भन्नाट असे बॅनर घेऊन उभारतात. आरसीबीच्या सामन्यात अशी बॅनरबाजी खूप पहायला मिळते. असाच एका छोट्या मुलीने हातात घेतलेला एक बॅनर सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या फोटोत एक आरसीबीचा टी शर्ट घालून उभी असलेली छोटी मुलगी दिसते. तिच्या हातात एक बॅनर दिसत आहे. त्यावर 'जोपर्यंत आरसीबी आयपीएल जिंकत नाही तोपर्यंत मी शाळेला जाणार नाही.' असा मजकूर लिहिलेला आहे. या फोटोवर सोशल मीडियावरील नेटकऱ्यांनी खूप रिअॅक्शन दिल्या आहेत.

इंडियन प्रीमियर लीगची सुरूवात 2008 पासून झाली. आतापर्यंत आयपीएलचे 15 हंगाम खेळण्यात आले आहेत. मात्र आरसीबीला एकदाही आयपीएलची ट्रॉफी उंचावता आली नाही. आरसीबी या 15 हंगामात तीनवेळा फायनलमध्ये पोहचली आहे. मात्र कायम स्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या आरसीबीच्या हातून ट्रॉफी निसटली.

आरसीबी तीनवेळा फायनल तर चार वेळा प्ले ऑफमध्ये देखील पोहचली आहे. तर आरसीबी 7 वेळा ग्रुप स्टेजमधून बाहेर पडली आहे. आरसीबीचे हे रेकॉर्ड नक्कीच चांगल्या श्रेणीत मोडत नाही. मात्र तरी देखील आरसीबीचा फॅन फॉलोईंग बेस हा खूप मोठा आहे.

यंदाच्या हंगामात आतापर्यंत आरसीबीने 8 सामने खेळले आहेत. त्यातील 4 सामने जिंकले असून चार गमावले आहेत. सध्या ते गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहेत. यंदाच्या आरसीबी संघातील विराट कोहली, फाफ ड्युप्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. तर मोहम्मद सिराज देखील विकेट्स घेण्यात अग्रेसर आहे.

(Sports Latest News)

हेही वाचा : Types of Vedas: वेदांचे प्रकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

Pune Cyber Crime : लग्नाचे आमिष दाखवून पुण्यात ४३ वर्षीय महिलेला २६ लाखांचा गंडा; येरवड्यात गुन्हा दाखल!

Raj Thackeray: पैसे फेकले की जनता विकत मिळते? ठाकरे बंधूंचा सरकारला थेट सवाल, राज ठाकरे म्हणाले- निवडणूक जिंकण्यासाठी...

SCROLL FOR NEXT