S Sreesanth Advice Rohit Sharma
S Sreesanth Advice Rohit Sharma  esakal
IPL

S Sreesanth On Rohit Sharma : सचिन धोनीच्या नेतृत्वाखाली खेळला आता रोहितला.... माजी वेगवान गोलंदाजाचा बाऊन्सर

अनिरुद्ध संकपाळ

S Sreesanth On Rohit Sharma IPL 2024 : भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस श्रीसंतने मुंबई इंडियन्समध्ये सुरू असलेल्या कर्णधारपदावरूनच्या वादावर आपलं मत व्यक्त केलं आहे. एस श्रीसंतने सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंह धोनीचं उदाहरण देत रोहित शर्माला सल्ला दिला आहे. तो म्हणतोय की सचिन तेंडुलकर हा धोनीच्या नेतृत्वाखाली खेळला. आता रोहित शर्माला हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळायला काय हरकत आहे.

मुंबई इंडियन्सचा आयपीएलच्या 17 व्या हंगामात सलग तीन सामन्यात पराभव झाला आहे. संघाची ढिसाळ कामगिरी हे कारण आहेच त्याचबरोबर संघात सुरू असलेल्या कॅप्टन्सीवरूनच्या वादामुळे देखील मुंबईची कामगिरी खालावत आहे. यावर आता श्रीसंतने सचिन तेंडुलकर अन् धोनीचं उदाहरण दिलं.

टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना श्रीसंत म्हणाला की, 'आपण क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरला देखील महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना पाहिलं आहे. आपण वर्ल्डकप देखील जिंकला. रोहित शर्माबाबत अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत. तो नवा कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. रोहित शर्माला मुक्तपणे खेळायला आवडतं.'

'मी जेवढा रोहित शर्माला ओळखतो त्याला मुक्तपणे फलंदाजी करायला आवडते. त्याला कर्णधारपदाचं ओझं न घेता खेळायला आवडेल. तो ऑरेंज कॅप देखील जिंकू शकतो. त्याच्यासाठी हा हंगाम उत्तम ठरू शकतो. त्यानं मुंबई इंडियन्सचं नेतृत्व केलं आहे. तो अजूनही पडद्यामागून संघाचं नेतृत्व करू शकतो.'

रोहित शर्माला सल्ला देताना श्रीसंत म्हणाला की, 'मी फक्त इतकच सांगेन की बदल स्विकारायला तयार रहा. तो कोणत्याही फ्रेंचायजीकडून खेळला तरी रोहित रोहितच असणार आहे. वैयक्तिकरित्या तो खूप अवघड स्थितीतून जात असेल याची मला खात्री आहे. मात्र मला खात्री आहे की तो त्याचा निर्णय घेईल आणि यातून बाहेर पडेल. रोहित या हंगामात मोठ्या धावा करेल.'

(IPL Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT