Sachin Tendulkar And Kiran More Sakal
IPL

VIDEO : मुंबई-पुणे वाहतूक कोंडी; सचिन झाला डोलकर दर्याचा राजा…!

सकाळ डिजिटल टीम

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सध्या सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय झाल्याचे दिसते. सध्याच्या घडीला विक्रमादित्य आयपीएल सामन्यात मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) मेंटॉरच्या भूमिकेत दिसत आहे. मुंबईतील 'बेस्ट' बसमधील बेस्ट क्लिकनंतर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar)मुं बई-पुणे महामार्गावरील प्रवासाचा खास व्हिडिओ शेअर केला आहे. मंगळवारी सचिनने शेअर केलेल्या व्हिडिओला चांगलीच पसंती मिळताना दिसते.

मुंबई इंडियन्सचा संघ आपला पुढील सामना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पुण्यातील गहुंजे मैदानावर खेळणार आहे. या सामन्यासाठी मुंबईचा संघ पुण्याला दाखल झाला आहे. सचिन तेंडुलकर कारमधून मुंबईहून पुण्याला आला. त्याच्यासोबत माजी क्रिकेटर किरण मोरेही कारमध्ये असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

त्यांना महामार्गावर त्याला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. यावेळी दोघांनी कारमध्ये "मी डोलकर डोलकर डोलकर दर्याचा राजा.." गाण्यावर ठेका धरल्याचे पाहायला मिळाले. सचिन तेंडुलकरने मुंबई-पुणे प्रवासा दरम्यानचा व्हिडीओ आपल्या सोशल अकाउंटवरुन शेअर केलाय. "मी डोलकर डोलकर डोलकर दर्याचा राजा…पुण्याला करतोय ये जा…" या खास मराठी कॅप्शनसह सचिनने कारमध्ये गाणे ऐकतानाचा व्हिडिओ शेअर केलाय.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विक्रमादित्य आपल्या फ्रेंचायझी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहे. सचिनने मुंबई इंडियन्सकडून 78 सामने खेळले असून यात त्याने 1 शतक आणि 13 अर्धशतकांसह 2334 धावा केल्या आहेत. आयपीएलच्या सुरुवातीच्या हंगामात त्याने संघाच्या नेतृत्वाची धूरा सांभाळली होती. त्याच्या नेतृत्वाखाली संघाला एकही जेतेपद मिळवता आले नाही. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने सर्वाधिक पाच वेळा ट्रॉफी जिंकली आहे. यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झालीये. पहिले दोन सामने गमावल्यानंतर पुण्याच्या मैदानात संघ पहिल्या विजय मिळवण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pre-Monsoon Rain Alert India : पुढील तीन दिवसांत मुसळधार पाऊस; IMD कडून 'या' राज्यांना अलर्ट जारी, एल निनोचं संकट तरीही 2026 मध्ये धो-धो कोसळणार!

NSE Gold: आता Demat मध्येही ठेवता येणार सोनं! NSE ची नवी डिजिटल गोल्ड योजना सुरू; नेमकं काय आहे EGR?

पैशांच्या नाही, तर प्रेमाच्या जोरावर विजय! लोकांच्या घरी भांडी घासणाऱ्या कलिता मांझी झाल्या आमदार, २५०० रुपयांच्या पगारात कशी जिंकली निवडणूक?

हार्दिक पांड्या खेळणार की नाही? मुंबई इंडियन्स म्हणते...

Angarki Sankashti Chaturthi 2026: आसपासच्या नकारात्मकतेपासून वाचण्यासाठी अंगारकी चतुर्थीच्या दिवशी सुरू करा श्रीगणेशाच्या 'या' रक्षा मंत्राचा जप

SCROLL FOR NEXT