Sanjay Manjrekar Statement About Hardik Pandya Captaincy esakal
IPL

'कॅप्टन' हार्दिक पांड्याने आश्चर्याचा धक्का दिला : मांजरेकर

अनिरुद्ध संकपाळ

अहमदाबाद : भारताचे माजी खेळाडू आणि समालोचक संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) आयपीएलच्या 15 व्या हंगामाबाबत (IPL 2022) आपले मत व्यक्त केले. ते राजस्थान रॉयल्स (RR) आणि रॉयल चॅलेंजर बेंगलोर (RCB) यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्याबाबतही बोलले. तसेच टी 20 वर्ल्डकप बाबतही त्यांनी आपले मत व्यक्त केले. संजय मांजरेकर यांनी आयपीएल फालनमध्ये पोहचलेल्या गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) भारतीय टी 20 संघाचे नेतृत्व करू शकेल का याबद्दल देखील वक्तव्य केले.

संजय मांजरेकर हार्दिक पांड्याबद्दल बोलताना म्हणाले की, 'हार्दिक पांड्याने आपल्या सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. गुजरात टायटन्सचे नेतृत्व करताना त्याने दाखवून दिले की तो किती सहजरित्या नेतृत्व करू शकतो.' मांजरेकर पुढे म्हणाले की, 'जर तुम्ही आयपीएलमध्ये संघाचे नेतृत्व करू शकता तर तुम्ही टीम इंडियाचे नेतृत्व देखील करू शकता.' मांजरेकरांच्या मते आयपीएलमध्ये दबाव आणि सर्वस्व पणाला लागलेलं असतं. त्यामुळे कर्णधाराला प्रचंड दबावाला सामोरे जावे लागते.

मांजरेकर म्हणाले, 'यंदाची आयपीएल ही एकाच गोष्टामुळे स्मरणात राहिल ती म्हणजे गुणवत्ता. फारसे चर्चेत नसलेल्या खेळाडूंनी चांगल्या गुणवत्तेचा खेळ केला. यंदाच्या हंगामात मोठ्या नावांनी नाही तर या जास्त प्रसिद्ध नसलेल्या खेळाडूंनी आयपीएलचा दर्जा खालावू दिला नाही. त्यांनी मोठ्या सामन्यात मोठे खेळाडू चालतात हा गैरसमज दूर केला.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

जय शाहांनंतर आणखी एक भारतीय ICC मध्ये! नवे CEO झालेले संजोग गुप्ता आहेत तरी कोण?

Latest Maharashtra News Updates : डेटिंग ॲप वर मुलीचे बनावट प्रोफाइल तयार करून तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

SCROLL FOR NEXT