Shah Rukh Khan X/KKRiders
IPL

IPL 2024: 'हरण्यासाठी पात्र नव्हतो, पण...' KKR च्या पराभवानंतर शाहरुखचे ड्रेसिंग रुममध्ये 'चक दे' स्टाईल भाषण, पाहा Video

Shah Rukh Khan Speech: राजस्थान रॉयल्सविरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स पराभूत झाल्यानंतर संघमालक शाहरुख खानने ड्रेसिंग रुममध्ये केलेल्या भाषणाचा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे.

Pranali Kodre

IPL 2024: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत मंगळवारी (16 एप्रिल) 31 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सला घरच्या मैदानावर ईडन गार्डन्सवर राजस्थान रॉयल्सकडून पराभवाचा धक्का बसला. राजस्थानने या सामन्यात शेवटच्या चेंडूवर 2 विकेट्सने विजय मिळवला.

हा कोलकाताचा सहा सामन्यांतील दुसरा पराभव आहे. दरम्यान, या पराभवानंतरही कोलकाता संघाचा सहसंघमालक शाहरुख खानने संघातील खेळाडूंचे मनोबल वाढवले आहे.

या सामन्यात कोलकाताने राजस्थानसमोर 224 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग राजस्थानने 8 विकेट्स गमावत शेवटच्या चेंडूवर पूर्ण केला. या सामन्यानंतर शाहरुख खान कोलकाता संघातील खेळाडूंना ड्रेसिंग रुममध्ये भेटला.

यावेळी शाहरुखने प्रेरणा देणारे भाषणही केले. तो म्हणाला, 'प्रामाणिकपणे सांगायचे झाले, तर आपण ज्याप्रकारे खेळलो, ते पाहून हा अभिमानाचा दिवस आहे. मी कोणा एकाचे नाव घेणार नाही. वाईट वाटून घेऊ नको गौतम गंभीर. आपण पुनरागमन करू.'

'रिंकू म्हणतो तसं ही ईश्वराची योजना असेल. आपण अजून चांगल्या प्रकारे आणि देवाच्या चांगल्या योजनेसह पुनरागमन करू.'

याशिवाय शाहरुख म्हणाला, 'असे काही दिवस आपल्या आयुष्यात असतात, विशेषत: खेळामध्ये, जिथे आपण पराभवासाठी पात्र नसतो आणि काही दिवस असे असतात, जिथे आपण विजयासाठी पात्र नसतो. आज आपण हरण्यासाठी पात्र नव्हतो.

शाहरुख पुढे म्हणाला, 'आपण सर्वजण खूप चांगले खेळलो. स्वत:बद्दल अभिमान वाटला पाहिजे. कृपया वाईट वाटून घेऊ नका. चेंज रुममध्ये येताना जसा आनंद वाटतो, तसाच तो वाटू द्या. आपण उच्च दर्जा राखला आहे आणि हाच दर्जा कायम करणार आहोत.'

'सर्वात महत्त्वाची गोष्टी आपल्या सर्वांमधील उर्जा आहे. मला वाटते आपण मैदानातही उर्जा दाखवली, तसेच इथेही सर्वांचे चांगले बाँडिंग आहे. त्यामुळे आपण पुढे जात राहू, सर्वांना शुभेच्छा.'

शाहरुख खानच्या या भाषणाचा व्हिडिओ कोलकाता नाईट रायडर्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओवर चाहत्यांकडूनही मोठ्या प्रमाणात कमेंट्स आल्या आहेत. अनेकांना शाहरुखने चक दे इंडिया या चित्रपटात निभावलेल्या हॉकी प्रशिक्षकाच्या भूमिकेचीही आठवण झाली आहे. (KKR Owner Shah Rukh Khan Speech)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT