Shivam Dube Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders
Shivam Dube Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders ESAKAL
IPL

Shivam Dube CSK vs KKR : झुंजार शिवम दुबे केकेआरला एकटा भिडला; उभारली सन्मानजनक धावसंख्या

अनिरुद्ध संकपाळ

Shivam Dube Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders : आयपीएलच्या 16 व्या हंगामात प्ले ऑमध्ये जाण्यासाठी धडपडणाऱ्या चेन्नईची आज केकेआरसमोर अवस्था बिकट झाली होती. त्यांचा निम्मा संघ हा 72 धावात गारद झाला. मात्र डावखुऱ्या शिवम दुबेने नाबाद 48 धावांची झुंजार खेळी केली. त्याला रविंद्र जडेजाने 20 धावांची खेळी करत चांगली साथ दिली. सलामीवीर डेवॉन कॉन्वेने देखील 30 धावांचे योगदान दिले. या दोघांच्या 68 धावांच्या भागीदारीमुळे चेन्नईने 20 षटकात 6 बाद 144 धावांपर्यंत मजल मारली. केकेआरकडून वरूण चक्रवर्ती आणि सुनिल नरेनने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजी करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जची सुरूवात आक्रमक झाली. सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉन्वेने 3 षटकात 30 धावा केल्या होत्या. मात्र वरूण चक्रवर्तीने ऋतुराजला 17 धावांवर बाद केले. यानंतर आलेल्या अजिंक्य रहाणे आणि कॉन्वेने सीएसकेला 8 षटकात 61 धावांवर पोहचवले. मात्र चक्रवर्तीने अजून एक धक्का देत अजिंक्य रहाणेला 16 धावांवर बाद केले.

दुसऱ्या बाजूने सावध फलंदाजी करणारा डेवॉन कॉन्व 30 धावांपर्यंत पोहचला होता. मात्र शार्दुल ठाकूरने त्यालाही 10 व्या षटकात बाद करत चेन्नईची अवस्था 3 बाद 66 अशी केली. चेन्नईचा सेट झालेला फलंदाज बाद झाल्यानंतर अंबाती रायुडू आणि शिवम दुबे डाव सावरतील असे वाटत होते. मात्र सुनिल नरेनने रायुडूला 4 धावांवर बाद केले. याच षटकात नरेनने मोईन अलीला देखील 1 धावेवर बाद करत सीएकेची अवस्था 5 बाद 72 अशी केली.

चेन्नईची अवस्था 5 बाद 72 धावा अशी झाली असताना डावखुरे फलंदाज शिवम दुबे आणि रविंद्र जडेजाने चेन्नईला सावरले. या दोघांनी 17 व्या षटकात चेन्नईचे शतक धावलफलकावर लावले. या दोघांनी ही भागीदारी अर्धशतकापर्यंत नेली. आक्रमक फलंदाजी करणारा शिवम दुबेही आपल्या अर्धशतकीजवळ पोहचला होता.

शिवम दुबेच्या हातात फक्त शेवटचे षटक होते. त्याला आपलेही अर्धशतक आणि चेन्नईलाही दीडशतकी मजल मारून द्यायची होती. शेवटचे षटक टाकणाऱ्या वैभव अरोराने पहिल्या 3 चेंडूवर 5 धावा दिल्या. त्यानंतर चौथ्या चेंडूवर रविंद्र जडेजा 24 चेंडूत 20 धावा करून बाद झाला. दुबे आणि जडेजाची 68 धावांची भागीदारी तुटली.

मात्र मैदानावर एकच जल्लोष झाला कारण धोनी फलंदाजीला आला. शेवटचे दोन चेंडू वाट्याला असताना धोनीला फ्री हिट मिळाली. मात्र वैभवने धोनीचा त्रिफळा उडवला. संपूर्ण मैदान शांत झाले. आता धोनीकडे षटकार मारण्यासाठी फक्त 1 चेंडू होता. मात्र त्यावर धोनीला फक्त 2 धावाच करता आल्या. चेन्नईने 20 षटकात 6 बाद 144 धावांपर्यंत मजल मारली. शिवम दुबेने नाबाद 48 धावांची झुंजार खेळी केली.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: वादळी वाऱ्यामुळे लोणी-काळभोरमध्ये बँड पथकावर होर्डिंग कोसळलं, घोडा गंभीर जखमी

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरू चेन्नई प्लेऑफच्या एका जागेसाठी भिडणार, पण पावसाचे अंदाज काय?

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Virat Kohli: भारतीय संघात संधी मिळण्यासाठी रैनाची कशी झाली मदत? विराटनं सांगितली 16 वर्षांपूर्वीची आठवण

Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान मोदींनी रायबरेली, अमेठीत प्रचार करणे टाळले, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT