Sunrisers Hyderabad X/IPL
IPL

SRH vs RR: हैदराबादला मॅच जिंकून देणारा भूवीचा जबरदस्त यॉर्कर अन् काव्या मारनचं भन्नाट सेलिब्रेशन, पाहा शेवटच्या चेंडूचा थरार

Kavya Maran Reaction: सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सविरुद्ध 1 धावेने विजय मिळवल्यानंतर चाहत्यांसह खेळाडूंनी जल्लोष केला होता. यावेळी काव्या मारनने दिलेली रिअ‍ॅक्शनही चर्चेत आहे.

Pranali Kodre

SRH vs RR, IPL 2024: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत (IPL) गुरुवारी (2 मे) सनरायझर्स हैदराबाद संघाने राजस्थान रॉयल्सविरुद्ध 1 धावेने रोमांचक विजय मिळवला. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेला हा सामन्यात शेवटच्या चेंडूपर्यंत रोमांच पाहायला मिळाला होता.

या सामन्यात शेवटच्या चेंडूवर राजस्थानला विजयासाठी 2 धावांची गरज होती. मात्र भूवनेश्वर कुमारने गोलंदाजी केलेल्या शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू यॉर्कर टाकला, ज्यावर रोवमन पॉवेल पायचीत झाला आणि हैदराबादच्या विजयावर शिक्कामोर्तब झाला.

हैदराबादसाठी प्लेऑफच्या शर्यतीत आपले आव्हान भक्कम करण्यासाठी हा विजय महत्त्वाचा होता. त्यामुळे हा सामना शेवटच्या क्षणी अखेर खिशात घातल्यानंतर हैदराबादच्या चाहत्यांसह खेळाडूंनीही मोठा जल्लोष केला.

इतकेच नाही, तर सनरायझर्स हैदराबाद संघाची मुख्य कार्यकारी अधिकारी काव्या मारननेही आनंदाने उजी मारत जोरदार सेलीब्रेशन केले. हैदराबादच्या या रोमांचक विजयाच्या क्षणाचा व्हिडिओ आयपीएलनेही शेअर केला आहे.

या सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 बाद 201 धावा केल्या होत्या. ट्रेविस हेडने 44 चेंडूत 58 धावांची खेळी केली, तर नितिश रेड्डीने 42 चेंडूत 76 धावांची खेळी केली. तसेच हेन्रिक क्लासेनने 19 चेंडूत नाबाद 42 धावांची खेळी केली. राजस्थानकडून आवेश खानने २ विकेट्स घेतल्या.

त्यानंतर राजस्थान रॉयल्सने 20 षटकात 7 बाद 200 धावा केल्या. राजस्थानकडून 49 चेंडूत 77 धावांची खेळी केली, तर यशस्वी जैस्वालने 40 चेंडूत 67 धावांची खेळी केली.

मात्र, त्यांच्या या खेळींनंतरही राजस्थानला विजयासाठी अवघी 1 धाव कमी पडली. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तर पॅट कमिन्स आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonia Gandhi on VB-G-RAM-G: ''सरकारने ‘मनरेगा’वर बुलडोझर फिरवला'' ; नाव बदलावरून सोनिया गांधींची जोरादार टीका!

Mumbai: भाजप आमदाराने रिक्षाचालकाच्या कानशिलात लगावली; मुंबईतील धक्कादायक घटना, कारण काय?

ASHA MOVIE REVIEW: विषय, कथा, मांडणी सुंदर पण प्रेक्षकांना भावेल का? कसा आहे रिंकू राजगुरूचा 'आशा' चित्रपट?

Latest Marathi News Live Update : धर्माबादच्या गोरोबाकाका मंदिरात जवळपास शंभर महिला नजर कैदेत

BMC Election: महापालिका निवडणुकीसाठी पोलीस सज्ज! मनाई आदेशांसह विशेष पथके तैनात; गुन्ह्यांवरही कडक नजर

SCROLL FOR NEXT