Mustafizur Rahman - Ravindra Jadeja | CSK | IPL 2024 Sakal
IPL

SRH vs CSK: चेन्नई संघात मुस्तफिजूरच्या जागेवर कोण खेळणार? 'हे' चार गोलंदाज प्रबळ दावेदार

CSK Predicted Playing XI: चेन्नई सुपर किंग्सचा प्रमुख गोलंदाज मुस्तफिजूर रहेमान सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध नाही. त्यामुळे त्याच्याजागेवर चेन्नईला दुसऱ्या खेळाडूला संधी द्यावी लागणार आहे.

Pranali Kodre

Chennai Super Kings News: शुक्रवारी (5 एप्रिल) सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत सामना होणार आहे. हा सामना हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार असून संध्याकाळी 7.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल.

हा सामना दोन्ही संघासाठी प्रत्येकी चौथा सामना आहे. या सामन्यातून दोन्ही संघ विजयी पथावर परतण्यासाठी उत्सुक असतील. कारण चेन्नई आणि हैदराबाद या दोन्ही संघांनी त्यांच्या शेवटच्या सामन्यात पराभव स्विकारला आहे.

दरम्यान, हैदराबादविरुद्धच्या सामन्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सला एक धक्का बसला आहे. त्यांचा या हंगामात आत्तापर्यंत सर्वाधिक विकेट्स घेणारा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रेहमान हा या सामन्यासाठी उपलब्ध नाही.

तो जून 2024 मध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी20 वर्ल्डकपसाठी व्हिसाचे काम करण्यासाठी परतला आहे. याचमुळे तो हैदराबादविरुद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध नसेल. त्यामुळे आता त्याच्याजागेवर चेन्नईला प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करावा लागणार आहे.

चेन्नईकडे मुस्तफिजूरच्या जागेवर संधी देण्यासाठी काही चांगले पर्याय सध्या उपलब्ध आहे. चेन्नईला वेगवान गोलंदाज म्हणून शार्दुल ठाकूर आणि मुकेश कुमार यांचे पर्याय उपलब्ध आहेत. हे दोघेही मुस्तफिजूरची जागा घेऊ शकतात.

त्याचबरोबर मिचेल सँटेनर आणि महिश तिक्षणा हे दोन परदेशी फिरकीपटू हे देखील पर्याय आहे, जे मुस्तफिजूरची जागा घेऊ शकतात. त्यातही शार्दुल ठाकूरला संधी मिळण्याची अधिक शक्यता आहे. जर फिरकी गोलंदाजाला संधी द्यायची झाल्यास सँटेनरचा विचार होऊ शकतो.

याशिवाय चेन्नई संघात फार बदल होण्याची शक्यता कमी आहे. शिवम दुबे आणि मथिशा पाथिराना इम्पॅक्ट खेळाडू म्हणून संघात असतील.

जर चेन्नईने प्रथम फलंदाजी केली, तर दुबे प्लेइंग इलेव्हनमध्ये असू शकतो, त्याच्या जागेवर दुसऱ्या डावात पाथिराना इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळू शकतो.

तसेच जर प्रथम गोलंदाजी चेन्नई करणार असेल, तर पाथिराना प्लेइंग इलेव्हनमध्ये असेल, तर दुसऱ्या डावात दुबे इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळू शकतो.

असा असू शकते चेन्नईची संभावित प्लेइंग इलेव्हन

  • ऋतुराज गायकवाड, रचिन रविंद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिचेल, समीर रिझवी, रविंद्र जडेजा, एमएस धोनी, दीपक चाहर, तुषार देशपांडे, शार्दुल ठाकूर/मिचेल सँटेनर, शिवम दुबे आणि मथिशा पाथिराना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Changur Baba : अंगठ्या अन् रत्न विकायचा, ५ वर्षात जमवली १०० कोटींची माया; धर्मांतर रॅकेट प्रकरणी अटक केलेला छांगुर बाबा कोण?

बौद्ध धर्मगुरू दलाई लामांना 'भारतरत्न' देण्याची मागणी; 80 खासदारांनी केली पाठिंबा दर्शवणारी स्वाक्षरी, मोदी सरकार घेणार लवकरच निर्णय?

Guru Purnima 2025 Greeting Card: गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूंसाठी बनवा खास ग्रीटिंग कार्ड, जाणून घ्या सोपी पद्धत

Oxford Graduate: ऑक्सफर्ड विद्यापीठाचा पदवीधर करतोय फूड डिलिव्हरी; दरमहा कमावतोय लाखो रुपये, म्हणाला...

Solapur Crime: निर्दयी मुलाने बापाला चाबकाचे फटके देऊन संपविले, घरात रक्ताचा पाट वाहिला तरी...सोलापूर हादरले !

SCROLL FOR NEXT