Steve Smith Video of landing on Head During Australia vs Sri Lanka 2nd T 20 Match
Steve Smith Video of landing on Head During Australia vs Sri Lanka 2nd T 20 Match esakal
IPL

स्मिथचा VIDEO पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल त्याचा दिवसच खराब होता!

अनिरुद्ध संकपाळ

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) हा कधीकाळी विराट कोहलीचा कट्टर प्रसिस्पर्धी म्हणून ओळखला जात होता. मात्र 'सँडपेपर' (Sandpaper gate) प्रकरणानंतर त्याची सगळी रयाच गेली आहे. रविवारी झालेल्या आयपीएल लिलावात (IPL 2022 Auction) त्याच्यावर एकही संघांने बोली लावली नाही. त्यातच रविवारी श्रीलंकेबरोबर झालेल्या दुसऱ्या टी 20 सामन्यात (Australia vs Sri Lanka) त्याने अप्रतिम फिल्डिंग केली. मात्र यानंतर त्याला मैदान सोडावे लागले. मिळालेल्या वृत्तानुसार तो आता श्रीलंकेविरूद्धच्या टी 20 मालिकेला मुकणार आहे. (Steve Smith Video of landing on Head During Australia vs Sri Lanka 2nd T 20 Match)

क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या एका नियमामुळे स्टीव्ह स्मिथला बिग बॅश लीगची (Big Bash League) अंतिम फेरी खेळता आली नव्हती. यावरून चांगलाच गदारोळ झाला होता. त्यानंतर आता आयपीएलमध्ये दोन दिवसांच्या लिलावात त्याला एकही खरेदीदार मिळाला नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावरील हा अव्वल फलंदाज अनसोल्ड राहिला. त्या भरीस भर म्हणून रविवारीच श्रीलंकेविरूद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात त्याला फक्त 18 धावांचे योगदान देता आहे. मात्र त्याने याची कसर फिल्डिंगमधून भरून काढण्याचा प्रयत्न केला.

स्टीव्ह स्मिथने सीमारेषेवर अप्रतिम फिल्डिंग करत षटकार अडवण्याचा प्रयत्न केला. त्याने यशस्वीरित्या षटकार देखील आडवला. मात्र तो अडवल्यानंतर त्याचे डोके जमिनीवर जोरात आदळले. त्यामुळे तो मैदानावर वेदनेने कळवळत होता. ही घटना श्रीलंकेच्या डावातील 20 व्या षटकात घडली. लंकेचा फलंदाज महीश तिकशानाने मार्कस स्टॉयनिसला (Marcus Stoinis) षटकार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र स्मिथने तो षटकार अडवला. हा षटकार अडवतानाच त्याच्या डोक्याला दुखापत झाली.

स्टीव्ह स्मिथने अडवलेला हा षटकार ऑस्ट्रेलियाच्या (Australia Cricket Team) चांगलाच कामी आला. कारण श्रीलंकेला 20 षटकात 8 बाद 168 धावांपर्यंतच मजल मारता आली. पुढे ऑस्ट्रलियानेही 20 षटकात 6 बाद 164 धावाच केल्याने सामना सुपर ओव्हरमध्ये (Super Over) गेला. सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेला फक्त 5 धावाच करता आल्या. कांगारूंनी हे 5 धावांचे आव्हान 3 चेंडूतच पार केले. मात्र कांगारूंचा हा विजय ज्या स्मिथच्या षटकार अडवण्याने झाला तो स्मिथ मात्र डोक्याला आघात झाल्यामुळे मालिकेतील पुढेच्या सर्व सामन्यांना मुकला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: लोकसभेनंतर आता फडणवीसांनी सांगितलं विधानसभेचं गणित; मुख्यमंत्रीपदाबाबत केलं मोठं वक्तव्य

Char Dham Yatra 2024: सावधान नाहीतर रीलच्या नादात जाल जेलमध्ये...उत्तराखंड सरकारने घेतला मोठा निर्णय, अधिकारी तळ ठोकून

Nepal Bans: आता नेपाळनेही MDH, EVEREST मसाल्यांवर केली मोठी कारवाई; आयात आणि विक्रीवर घातली बंदी

Cannes 2024: हात फ्रॅक्चर तरीही कान्समध्ये दिसला ऐश्वर्याचा जलवा; लेक आराध्याचं 'या' कारणामुळे होतंय कौतुक

Neelam Gorhe : जातीय तेढीमुळे आत्महत्या वाढतात;नीलम गोऱ्हे,कृषी क्षेत्रातील चांगल्या गोष्टींकडेही लक्ष द्या

SCROLL FOR NEXT