Shardul Thakur Suhana Khan IPL 2023  esakal
IPL

Suhana Khan : सुहाना ज्यावेळी शार्दुल ठाकूरला भेटते... सामना संपल्यानंतर काय झालं की एवढी चर्चा होतेय?

अनिरुद्ध संकपाळ

Shardul Thakur Suhana Khan IPL 2023 : कोलकाता नाईट रायडर्सचा संघ मालक शाहरूख खान आपल्या मेहमान नवाजीसाठी कायम चर्चेत असतो. तो आपल्या पाहुण्यांचा एकदम अदबीने पाहुणचार करतो अशी त्याची ख्याती आहे. हीच तालीम त्याने आपल्या मुलांना देखील दिली आहे. शाहरूख खानची कन्या सुहाना खानने केकेआर आणि आरसीबी सामन्यादरम्यान दाखवलेल्या अदबीची सध्या चर्चा होत आहे. याबाबतचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.

केकेआरने आपल्या होम ग्राऊंडवर आरसीबीचा 81 धावांनी पराभव केला. या सामन्यात तडाखेबाज 63 धावांची खेळी करणाऱ्या शार्दुल ठाकूरला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. त्याने संघाची अवस्था 5 बाद 89 अशी झाली असताना ही तडाखेबाज खेळी करत संघाला 204 धावांपर्यंत मजल मारून दिली होती.

सामना झाल्यानंतर त्याला सामन्याचा मानकरी म्हणून घोषित करण्यात आले. यावेळी त्याला सामनावीराची ट्रॉफी ही केकेआरचा संघ मालक शाहरूख खानची मुलगी सुहाना खानच्या हस्ते देण्यात आली. यावेळी सुहाना खानने शार्दुलला ट्रॉफी दिली त्यानंतर ती स्वतः त्याच्या जवळ उभे राहत फोटो काढून घेतला. तिने असे करत शार्दुल ठाकूरला सन्मान दिला जे अपेक्षितच होते.

मात्र एका मोठ्या सेलिब्रेटी आणि संघ मालकाच्या मुलीने स्वतःच्या संघातील एका खेळाडूला असा सन्मान देणे नेटकऱ्यांना विशेष वाटले. त्यामुळे या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. शाहरूख खानने ज्यावेळी वानखेडेवर एका गार्डबरोबर हुज्जत घातली होती. त्यावेळी देखील त्याला त्यांच्या मुलांनी आर्यन खान आणि सुहानाकडून बोलणी खावी लागली होती.

शाहरूखचा तो वाद सोडला तर तो आपल्या संघातील खेळाडूंशी देखील आपल्या कुटुंबासारखा भेटतो. तो त्यांच्या कुटुंबीयांना देखील चांगला सन्मान देतो. अनेकवेळा केकेआरच्या संघातील खेळाडू शाहरूख खानसोबत फोटो काढताना आपण पाहिले आहे.

(Sports Latest News)

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मला पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' नशेत धुंद मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT