Gautam Gambhir on Sunil Narine News Marathi SAKAL
IPL

IPL 2024 : 2011 मध्येच नारायणबाबत हा अंदाज लावला...; गंभीरने कॅरेबियन स्टारबद्दल केलं अनेक खुलासे

Gautam Gambhir on Sunil Narine : २०११ मध्ये भारतात झालेल्या एकदिवसीय सामन्यात सुनील नारायणने पदार्पण केले होते.

Kiran Mahanavar

Gautam Gambhir on Sunil Narine : सुनील नारायण हा आयपीएलमधील सर्वोत्तम गोलंदाज आहे. टी-२० प्रकारात तो वेस्ट इंडीजचा महान गोलंदाज आहे, असे मत भारताचे माजी खेळाडू आणि कोलकता संघाचे मेंटॉर गौतम गंभीर याने व्यक्त केले.

२०११ मध्ये भारतात झालेल्या एकदिवसीय सामन्यात सुनील नारायणने पदार्पण केले होते. त्यावेळी आपण नारायणची गोलंदाजी पाहिली आणि त्याला कोलकता संघात निवड करण्याचा विचार पक्का केला होता, असे गंभीरने सांगितले.

वेस्ट इंडीजविरुद्धच्या त्या सामन्यात मी नारायणच्या सात ते आठ चेंडूंचा सामना केला, तेव्हाच हा गोलंदाज प्रामुख्याने टी-२० प्रकारात महान गोलंदाज होणार हे जाणले होते. इतक्या वर्षांनंतरही नारायणचा दबदबा कायम आहे, आयपीएलमधील तो सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे, असे गंभीर म्हणाला.

सुनील नारायणने १६८ आयपीएल सामन्यांत १७० विकेट मिळवले असून फलंदाजीतही त्याने १३२२ धावा फटकावलेल्या आहेत. त्यात एका शतकाचा समावेश आहे.

२०११ मध्ये भारताविरुद्ध अहमदाबादमध्ये एकदिवसीय पदार्पण करताना नारायणने २३ धावांत २ विकेट मिळवताना विराट कोहली आणि रवीचंद्रन अश्विन यांना बाद केले होते; परंतु इंदूर येथे झालेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात गंभीरने नारायणचा सामना केला. त्या सामन्यात मात्र नारायणला ४६ धावांत एकही विकेट मिळवता आलेली नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT