SRH vs PBKS esakal
IPL

SRH vs PBKS : हैदराबादचा विजय अन् राजस्थानचं वाढणार टेन्शन; पंजाब खेळणार नव्या कर्णधारच्या नेतृत्वात

अनिरुद्ध संकपाळ

Sunrisers Hyderabad Vs Punjab Kings IPL 2024 : तीन वर्षांनंतर पहिल्यांदा प्ले-ऑफ गाठल्यानंतर आता दुसरा क्रमांक मिळवण्याचे ध्येय हैदराबाद संघाने बाळगले आहे. उद्या त्यांचा सामना पंजाब संघाविरुद्ध होत आहे. पंजाबसाठी हा सामना नववा क्रमांक टाळण्यासाठी असणार आहे.

पहिल्या दोन संघांत स्थान मिळवले तर कॉलिफायर-१ हा सामना खेळायला मिळतो आणि त्यामुळे अंतिम सामना गाठण्याची आणखी एक संधी मिळत असते. त्यासाठी हैदराबाद संघासाठी आता दुसरा क्रमांक महत्त्वाचा ठरत आहे. सध्या ते १५ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत आणि दुसऱ्या स्थानासाठी त्यांची राजस्थानविरुद्ध शर्यत आहे.

पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या हैदराबादकडे संभाव्य विजेता संघ म्हणूनही पाहिले जात आहे. झंझावाती फलंदाजी हे त्यांचे प्रमुख अस्त्र आहे. काही दिवसांपूर्वी गुजरातविरुद्धचा सामना पावसामुळे वाया गेला होता. त्यामुळे त्यांना केवळ एका गुणावर समाधान मानावे लागले होते.

हैदराबादकडे धोकादायक संघ म्हणून पाहिले जात असले तरी गेल्या सहा सामन्यांत त्यांची कामगिरी अपेक्षेनुसार झालेली नाही. यात केवळ दोनच विजय त्यांच्या हाताशी लागले तर तीन सामन्यांत पराभव झाला आणि एक सामना पावसामुळे वाया गेला. मात्र लखनौविरुद्ध झालेल्या अखेरच्या सामन्यात त्यांनी १० विकेटने दणदणीत विजय साकार केला होता. ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी दीडशेच्या पुढील धावसंख्या १० षटकांच्या आतच पार केली होती.

ट्रॅव्हिड हेडने २०१.८९ च्या स्ट्राईक रेटने ११ सामन्यातून ५३३ धावा केल्या आहे. ऑरेंज कॅपसाठी तो विराट कोहलीच्या (६६१) थोडा पाठीमागे आहे. हेड आणि अभिषेक शर्मा या सलामीवीरांचा अपवाद वगळता हैदराबादची मधली फळी तेवढी भरवशाची नाही. हेन्रिच क्लासेनकडे सातत्याचा अभाव आहे, तर नितीश कुमार रेड्डी काही सामन्यांत फारच चांगला खेळलेला आहे.

पंजाबने गेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा पराभवाचा धक्का दिला असला तरी हंगामी कर्णधार सॅम करनसह इतर इंग्लिश खेळाडू मायदेशी परतले आहेत. त्यामुळे जितेश शर्मा उद्या नेतृत्व करणार आहे. मूळ कर्णधार शिखर धवन खांदा दुखापतीमुळे केव्हाच संघाबाहेर गेलेला आहे.

पंजाब संघाकडे आता एक-दोनच परदेशी खेळाडू आहेत. त्यामुळे उद्याच्या सामन्यात भारतीय खेळाडूंवरच त्यांची मदार असणार आहे. शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा हैदराबादच्या गोलंदाजांविरुद्ध कशी कामगिरी करतात याची उत्सुकता असेल.

(IPL 2024 Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohammed Shami: ३ सामन्यात १५ विकेट्स... शमीचा परफॉर्मन्स जबर, तरी संघाबाहेर! आगरकर-गंभीर वादामुळे ‘क्लीन बोल्ड’?

Indurikar Maharaj daughter engagement : निवृत्ती महाराज इंदुरीकरांकडून लेकीच्या साखरपुड्यात लाखोंचा खर्च? ; डबेवाला संघटना अध्यक्षांची जोरदार टीका, म्हणाले...

Sand Mafia Caught : महसूल विभागाचा वाळू माफीयांना दणका : संयुक्त कारवाईत अवैध वाळू उपसा करणाऱ्या दोन बोटी उडवल्या!

'लागली पैज?' नाटक येतंय प्रेक्षकांच्या भेटीला; 'शुभविवाह' फेम अभिनेता साकारतोय मुख्य भूमिका; रुमानी खरेचं रंगभूमीवर पदार्पण

Baramati Nagar Parishad Election : बारामतीत जय पवार यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्याची मागणी......

SCROLL FOR NEXT