Mumbai Indians Chase Down Royal Challengers Bengaluru Target in just 15 Overs
Mumbai Indians Chase Down Royal Challengers Bengaluru Target in just 15 Overs  esakal
IPL

MI vs RCB : बदलत्या टी 20 ची बदलती एमआय! चेस मास्टरचाच घेतला क्लास

अनिरुद्ध संकपाळ

Mumbai Indians Chase Down Royal Challengers Bengaluru Target in just 15 Overs : टी 20 क्रिकेट बदलतंय! आता 200 धावा देखील डिफेंड करताना पुरेशा वाटत नाहीत. आधी 200 धावा म्हणजे तुम्ही डोळे झाकून सामना जिंकला. आरसीबी आणि एमआय सामन्यात देखील ओल्ड स्कूल आरसीबी याच विचारात होती. 196 धावांच टार्गेट पुरेसं होईल.

मात्र मुंबई इंडियन्सनं आरसीबीचं ही समाधानकारक टोटल 15 षटकातच पार करत आरसीबीला तुम्ही काळाच्या किती मागं राहिला आहात हे दाखवून दिलं. मुंबई इंडियन्सनं इथंच आयपीएल 2024 चा टोन सेट केलाय. आता गुणतालिकेत मुंबई एक एक पायरी वर चढतेय.

आरसीबीविरूद्धच्या सामन्यात मुंबईनं 197 चेस करताना ज्या प्रकारे सुरूवात केली ते पाहता त्यांनी आधीच आपल्यासाठी सामना हा 15 षटकांचाच असेल असं गृहित धरलं असावं. इशान किशन अन् रोहित शर्मानं पॉवर प्लेमध्येच आरसीबीच्या गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या.

त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवनं 17 चेंडूत अर्धशतक ठोकत कहरच केला. हा पठ्ठ्या आताच दुखापतीतून सावरून संघात परतलाय. पहिल्यात सामन्यात भोपळा ही फोडता न आलेल्या सूर्यानं दुसऱ्या सामन्यात 19 चेंडूत 52 धावा चोपून बॅड पॅच अन् फॉर्म या संकल्पना मला लागूच होत नाहीत असं दाखवून दिलं.

मुंबईसाठी दुसरी समाधानाची बाब म्हणजे कर्णधार हार्दिक पांड्याने अखेर कॅप्टन्सीपाठोपाठ फलंदाजीत देखील संघाच्या विजयात योगदान दिलं. त्यानं 6 चेंडूत 21 धावा चोपत नव्या एमआय टीममध्ये आपण देखील फिट बसतो हे अधोरेखित केलं.

मुंबईच्या गोलंदाजीबद्दल काय बोलायचं? एक अकेला सब पर भारी असं म्हणत जसप्रीत बुमराह एकट्यानं आरसीबीचा निम्मा संघ खाल्ला. मात्र मुंबईच्या इतर गोलंदाजांनी निराशा केली. बुमराह विकेट घेत होता अन् दुसरे गोलंदाज धावांची खैरात वाटत होते. त्यामुळेच फक्त तीन फलंदाज डबल डिजीटमध्ये जाऊनही आरसीबीनं जवळपास 200 धावा उभारल्या.

आता आरसीबीकडं मोर्चा वळवू या! यंदाच्या हंगामात सर्वात मागास संघ म्हणून आरसीबी आपलं नाव करतंय. तीच जुनी नावं अन् तीच खेळण्याची जुनी पद्धत! आरसीबी ही चेस मास्टर टीम म्हणून ओळखली जाते. मात्र यंदाच्या हंगामात त्यांना चेस करण्याची संधी मिळालेली नाही. मात्र तरी त्यांनी ज्या प्रकारे टार्गेट सेट केलं ते पाहता ते अजून बदलत्या टी 20 क्रिकेटपासून खूप दूर आहेत असं दिसतंय.

इतर संघ आता स्ट्राईक रेटला जास्त महत्व देत आहेत. प्रत्येक खेळाडू जास्त चेंडूत मोठी धावसंख्या करण्यापेक्षा कमी चेंडूत इम्पॅक्टफूल खेळी करण्यावर भर देत आहेत. मुंबईच्या सामन्याविरूद्ध अशी खेळी दिनेश कार्तिक आणि रजत पाटीदारनं खेळली. मात्र फाफ अजूनही ओल्ड फॅशन इनिंगमध्येच अडकलेला दिसला.

आरसीबीच्या गोलंदाजीबाबत न बोललेलंच बरं! चिन्नास्वामीची खेळपट्टी फलंदाजीला पोषक असते. छोटी बाऊंड्री असल्यानं गोलंदाजाचं मरणच असतं. मात्र आरसीबीचे गोलंदाज आता अवे गेममध्ये देखील सपाटून मार खात आहेत. त्यांच्याकडे सर्व खेळपट्ट्यांवर चालेल असा एकही गोलंदाज नाहीये.

मुंबईविरूद्धच्या सामन्यात एकाही गोलंदाजाची इकॉनॉमी ही सिंगल डिजीटमध्ये नाही. यावरूनच आरसीबी नव्या टी 20 क्रिकेटला ओळखण्यात उशीर करत असल्याचं दिसतंय. यंदाच्या हंगामात त्यांची गाडी काही रूळावर येण्याची चिन्हं दिसत नाहीयेत. आता पुढच्या मेगा लिलावात तरी आरसीबी आपल्या संघात मोठे बदल करत कात टाकते का ते पहावं लागेल.

(IPL Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मतदानात महाराष्ट्र तळाला, आतापर्यंत झालेल्या मतदानात 'हा' मतदारसंघ आघाडीवर

T20 WC 2024 पूर्वी संघाने बदलला कर्णधार; 'या' स्टार खेळाडूकडे दिली टीमची कमांड

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

SCROLL FOR NEXT