Suryakumar Yadav IPL 2023  esakal
IPL

Suryakumar Yadav IPL : होम ग्राऊंडवर देखील सूर्या निस्तेज! अवघ्या दोन चेंडूत गुंडाळला गाशा

अनिरुद्ध संकपाळ

Suryakumar Yadav IPL 2023 : आयपीएलचा सर्वात हाय व्होल्टेज सामना, एल क्लासिको मुंबई विरूद्ध चेन्नई सामना आज वानखेडेवर होत आहे. मुंबई इंडियन्सचा संघ हंगामात पहिल्यांदाच आपल्या होम ग्राऊंडवर लाडक्या प्रेक्षकांसमोर खेळत आहे. याबाबत संघाचा 360 डिग्री खेळाडू सूर्यकुमार यादव नॉस्टेल्जिक देखील झाला होता.

मात्र सूर्यकुमार यादवला आपल्या होम ग्राऊंडवर दोन चेंडू देखील फलंदाजी करता आली नाही. मुंबईला गरज असताना तो अवघ्या 2 चेंडूत 1 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. सूर्या बाद झाल्याने मुंबईची चांगली होऊ पाहणारी सुरूवात खराब सुरूवातीत बदलली.

चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध मुंबई इंडियन्स या हाय व्होल्टंज सामन्यात मुंबईच्या होम ग्राऊंडवर चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्विकारली. मुंबईचे सलामीवीर रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी 4 षटकात 38 धावा करत चांगली सुरूवात करून देण्याचा प्रयत्न केला.

मात्र रविंद्र जडेजा आणि मिचेल सँटनर या दोन डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांनी मुंबईच्या फलंदाजीचे कंबरडेच मोडले. या दोघांनी पाठोपाठच्या षटकात दोन विकेट्स मिळवल्या. अशी कामगिरी त्यांनी दोन वेळा केली.

जडेजाने कॅमरून ग्रीनला 12 तर इशान किशनला 32 धावांवर बाद केले. तर मिचेल सँटनरने सूर्यकुमार यादवला 1 धावेवर आणि अर्शद खानला 2 धावेवर बाद केले. यामुळे मुंंबईची अवस्था 5 बाद 76 अशी झाली. आता मुंबईची भिस्त ही टीम डेव्हिड आणि 20 वर्षाच्या तिलक वर्मावर होती मात्र 18 चेंडूत 22 धावा केल्यावर जडेजाने त्याला देखील पॅव्हेलियनची वाट दाखवली.

(Sports Latest News)

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur News: भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूहाच्या संवर्धनासाठी ‘इंट्याक’ची हाक; खडकीतील दोन हजार वर्षांपूर्वीचा वारसा पाहण्यासाठी ‘हेरिटेज वॉक’!

Uddahv Thackeray : ‘भाजपकडून राज्यात भ्रष्टाचाराचे प्रदूषण’

CM Devendra Fadnavis : पुण्याची क्षमता २८० बिलियन डॉलर्सची; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मांडला पुण्याच्या विकासाचा ‘रोडमॅप’

Jaykumar Gore: साेलापुरातील प्रभाग सातसह शहरात भाजपच जिंकेल: पालकमंत्री जयकुमार गोरे; विकासामुळे नागरिक भाजपसोबत...

Sinhagad Fort : पर्यटकांना सिंहगडाचा मोह आवरेना; सुमारे एक लाख जणांची २० दिवसांत भेट

SCROLL FOR NEXT