Suryakumar Yadav
Suryakumar Yadav esakal
IPL

Suryakumar Yadav : सूर्याने अहमदाबादला जाता जाता केला 'लिंबू प्रँक', तिलक वर्माची अवस्था तर...

अनिरुद्ध संकपाळ

Suryakumar Yadav Tilak Varma Prank : आयपीएलच्या 16 व्या हंगामाची मुंबई इंडियन्सने अडखळती सुरूवात केली होती. मात्र मुंबईने लीग स्टेजमधील शेवटच्या दिवशी प्ले ऑफ गाठली अन् आता एलिमिनेटर सामन्यात लखनौचा तब्बल 81 धावांनी पराभव करत फायनलच्या दिशेने एक पाऊल पुढे देखील टाकले.

मुंबईने लखनौविरूद्ध प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 182 धावा केल्या होत्या. त्यानंतर लखनौला 101 धावात गुंडाळत सामना 81 धावांनी जिंकला. आकाश माधवालने 3.3 षटकात 5 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. तो मुंबईचा स्टार परफॉर्मर ठरला.

दरम्यान, या विजयानंतर खूष असणारी मुंबई इंडियन्सची टीम क्वालिफायर 2 सामन्यासाठी चेन्नईहून अहमदाबादला रवाना झाली. दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात मुंबई इंडियन्स गुजरात टायटन्सशी भिडणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी मुंबईचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव भलत्याच मूडमध्ये होता. त्याने विमानात झोपा काढणाऱ्या तिलक वर्माची चांगलीच गंमत केली.

सूर्याने तोंड उघडे ठेऊन झोपणाऱ्या तिलक वर्माच्या तोंडात लिंबूचा रस टाकला. यामुळे तिलक वर्मा झोपेतून जागा झाला अन् यात काय होतं असं विचरालं.

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर उत्तराखंडचा इंजिनियर आकाश माधवालने आपला आयपीएलमधला स्वप्नवत स्पेल टाकला. त्याने 5 धावात 5 विकेट्स घेत मुंबईला क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश मिळवून दिला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स शुक्रवारी 26 मे रोजी गुजरातशी दोन हात करणार आहेत. या सामन्यातील विजेता चेन्नई सुपर किंग्जसोबत रविवारी ट्रॉफीसाठी भिडेल.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: ईडीच्या अटकेबाबत केजरीवालांच्या बाजूनं निकाल येणार का? सुप्रीम कोर्टानं राखून ठेवला निकाल

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीत भाजप किती जागा जिंकेल? प्रशांत किशोर, योगेंद्र यादव यांनी दिलं उत्तर

परराष्ट्र मंत्रालयाकडून लाओस, कम्बोडियाला जाणाऱ्या भारतीयांसाठी अ‍ॅडव्हायझरी जारी; काय आहे कारण?

Forbes 30 Under 30: फोर्ब्सने '30 अंडर 30 एशिया' यादी केली जाहीर; 'या' भारतीयांनी मिळवले स्थान

MLA Raju Patil : आजची सभा ही अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावेळी होणाऱ्या सभांची आठवण करून देणार

SCROLL FOR NEXT