Suyash Sharma Yashasvi Jaiswal  esakal
IPL

Suyash Sharma Yashasvi Jaiswal : यशस्वीचं शतक पूर्ण होऊ नये म्हणून सुयशचा कुटील डाव, माजी खेळाडूने उपटले कान

अनिरुद्ध संकपाळ

Suyash Sharma Yashasvi Jaiswal : आयपीएलच्या 56 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्सचा 9 विकेट्स आणि 41 चेंडू राखून पराभव केला. केकेआरच्या 150 धावांचा पाठलाग करताना राजस्थानने 1 विकेट्सच्या मोबदल्यात 13.1 षटकांमध्ये 151 धावा ठोकल्या. राजस्थानचा सलामीवीर यशस्वी जैसवालने आयपीएलमधील सर्वात वेगवान अर्धशतक ठोकले. त्याच्या 47 चेंडूत केलेल्या 98 धावांच्या खेळीमुळे राजस्थानने दमदार नेट रनरेट राखत शानदार विजय मिळवला. मात्र अवघ्या 2 धावांनी यशस्वी जैसवालचे शतक हुकल्याची हुरहूर सर्वांच्याच मनाला लागून राहिली.

यशस्वी जैसवालला आपले शतक पूर्ण करण्यासाठी कर्णधार संजू सॅमसनने आपल्या अर्धशतकाची कुरबानी दिली होती. संजू 48 धावांवर खेळत होता. राजस्थानला विजयासाठी 3 धावांची गरज होती. गोलंदाजी युवा गोलंदाज सुयश शर्मा करत होता. सुयशने चेंडू लेग स्टम्पच्या बाहेर टाकला. मात्र हा चेंडू वाईड न जाऊ देता संजूने तटवला. सुयशने टाकलेल्या या चेंडूवर समालोचक आकाश चोप्राने आक्षेप घेतला. त्याने युवा सुयशला खडे बोल सुनावले.

आकाश चोप्राने ट्विट केले की, 'यशस्वीचे शतक होऊ नये म्हणून वाईड बॉल टाकण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे.'

सुयशचा डाव हाणून पाडल्यानंतर संजू सॅमसनने यशस्वी जैसवालला षटकार मारण्यासाठी खाणाखुणा केल्या होत्या. मात्र शार्दुल ठाकूरच्या वाईड यॉर्करवर यशस्वी जैसवालला चौकारच मारता आला. यानंतर संजू थोडा नाराज झाल्याचे त्याच्या हावभावावरून दिसून येत होते. मात्र यशस्वी जैसवालला या अपूर्ण राहिलेल्या शतकाशी काही घेणंदेणंच नसल्याचे दिसून आले.

यशस्वी जैसवाल आपण सामना संपेपर्यंत खेळलो आणि संघाला आवश्यक अशा पद्धतीने विजय मिळवून दिला याचाच अत्यानंतर झाला होता. यशस्वी या विजयाने किती खूष होता हे शार्दुल ठाकूरला चौकार मारल्यानंतर त्याने केलेल्या सेलिब्रेशनवरून स्पष्ट दिसत होते.

विशेष म्हणजे संजू सॅमसनने सामन्यानंतर संघातील वातावरण कसे आहे हे उदाहरण देऊन सांगितले. तो म्हणाला की, यशस्वी जैसवालसाठी जॉस बटलर सारखा दिग्गज खेळाडू आपल्या विकेटची कर्बानी देतो. यावरून आमच्या संघातील वातावरण कसे आहे याचा अंदाज येतो.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT