T20 World Cup 2024 Team India squad mayank yadav News Marathi  sakal
IPL

T20 World Cup 2024 : IPL मधून थेट टीम इंडियाच्या ताफ्यात होणार एंट्री... वर्ल्ड कपमध्ये सिराजचा पत्ता कट?

T20 World Cup 2024 Team India Squad : 21 वर्षीय वेगवान गोलंदाज मयंक यादवने आयपीएल 2024 मधील पहिल्या दोन सामन्यांमध्ये सर्वांना प्रभावित केले आहे.

Kiran Mahanavar

T20 World Cup 2024 Team India Squad : 21 वर्षीय वेगवान गोलंदाज मयंक यादवने आयपीएल 2024 मधील पहिल्या दोन सामन्यांमध्ये सर्वांना प्रभावित केले आहे. त्याच्या गोलंदाजीसोबतच त्याच्या वेगाचीही सर्वत्र चर्चा आहे.

लखनऊ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज मयंक यादवने पंजाब किंग्जविरुद्ध पदार्पण केले. त्याने 4 षटकात 27 धावा देत तीन विकेट घेतल्या. त्यानंतर त्याने आरसीबीविरुद्ध 4 षटकांत 14 धावा देत पुन्हा तीन विकेट घेतल्या. आणि त्याने त्याच्या पहिल्या दोन्ही आयपीएल सामन्यांमध्ये सामनावीराचा पुरस्कार पटकावला.

मयंक यादवच्या 156 KMPH आणि 157 KMPH स्पीड बॉलची सर्वत्र चर्चा आहे. या मोसमात त्याने आपल्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये सर्वांना इतके प्रभावित केले आहे की आता मयंक यादवला टी-20 वर्ल्ड कपसाठी खेळवण्याची मागणीही वाढू लागली आहे.

अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या खेळपट्ट्यांवर मयंक यादव टीम इंडियाचे सरप्राईज पॅकेज ठरू शकतो का, अशीही चर्चा आहे. 1 जूनपासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची निवड एप्रिलच्या अखेरीस होणार आहे. आयपीएलच्या कामगिरीमुळे खेळाडूंना संघात स्थान मिळू शकते. पण अनकॅप्ड मयंकला संधी मिळेल की नाही हे त्याच्या आगामी सामन्यांमधील कामगिरी आणि निवड समितीवर अवलंबून असेल.

एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 मध्ये टीम इंडियासाठी सर्वाधिक विकेट घेणारा मोहम्मद शमी टी-20 वर्ल्ड कपसाठी तंदुरुस्त राहणार नाही. आणि तो आयपीएलमध्येही खेळत नाही. अशा परिस्थितीत टीम इंडिया वर्ल्ड कपसाठी त्याच्या बदलीच्या शोधात आहे.

मोहम्मद सिराज टी-20 फॉरमॅटमध्ये सातत्याने निराशा करत आहे. त्यामुळे त्याचा पत्ता कट होऊ शकतो. आणि त्याचबरोबर मोहित शर्माच्या नावाचीही सातत्याने चर्चा होत आहे. आता या शर्यतीत मयंक यादवही उतरला आहे. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील समिती मास्टरस्ट्रोक खेळून टीम इंडियाला सरप्राईज पॅकेज देते की नाही हे पाहायचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते; पहाटे 2.30 वाजता होणार महापूजा

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

SCROLL FOR NEXT