T20 World Cup Australia to play support staff as fielders in warm-up games sakal
IPL

T20 World Cup 2024 : IPLमुळे कांगारू संघ टेन्शनमध्ये; चक्क सपोर्ट स्टाफला खेळवणार वर्ल्ड कपमध्ये... जाणून घ्या का?

T20 World Cup 2024 Australia : टी-20 वर्ल्ड कप 2024 चा थरार येत्या 2 जूनपासून रंगणार आहे. याआधी सर्व संघ जोरदार तयारी करत आहे.

Kiran Mahanavar

T20 World Cup 2024 Australia : टी-20 वर्ल्ड कप 2024 चा थरार येत्या 2 जूनपासून रंगणार आहे. याआधी सर्व संघ जोरदार तयारी करत आहे. यादरम्यान ऑस्ट्रेलियन संघासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. ऑस्ट्रेलियाला मंगळवारी नामिबियाविरुद्ध सराव सामना खेळायचा आहे.

पण सराव सामन्यात सर्व खेळाडूंशिवाय त्यांना मैदानात उतरावे लागू शकते. त्यांचे सर्व खेळाडू अद्याप वेस्ट इंडिजला पोहोचलेले नाहीत. याचे एक प्रमुख कारण म्हणजे आयपीएल.

खरंतर, अनेक ऑस्ट्रेलियन दिग्गज खेळाडू आयपीएल 2024 मध्ये खेळत झाले होते. यातील काही खेळाडूंच्या संघांनी प्लेऑफ आणि फायनलपर्यंतचा प्रवास केला. ज्यामध्ये तीन मोठे प्रमुख खेळाडू आयपीएल 2024 चा अंतिम सामना खेळत होते. पॅट कमिन्स आणि ट्रॅव्हिस हेड सनरायझर्स हैदराबाद संघात होते, तर वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क केकेआर संघाचा भाग होता. या कारणास्तव त्यांना सराव सामन्यांमध्ये भाग घेणे अशक्य आहे.

ऑस्ट्रेलियन संघाला मंगळवारी नामिबियाविरुद्ध सराव सामना खेळायचा आहे. परंतु त्यासाठी सध्या केवळ 9 खेळाडू त्यांच्यासोबत उपलब्ध आहेत. मार्कस स्टॉइनिस आणि ग्लेन मॅक्सवेलसारखे खेळाडू सध्या ऑस्ट्रेलियात आहेत. कॅमेरून ग्रीन अद्याप वेस्ट इंडिजमध्ये पोहोचलेला नाही. त्यामुळे एकूणच ऑस्ट्रेलियन संघ अद्याप आलेला नाही आणि त्यांना मंगळवारी नामिबियाविरुद्ध सराव सामना खेळायचा आहे. अशा परिस्थितीत, खेळाडू आले नाहीत तर 11 खेळाडू पूर्ण करण्यासाठी सपोर्ट स्टाफ मैदानात खेळण्यासाठी उतरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramdas kadam : रामदास कदम यांचा आणखी एक खळबळजनक दावा, थेट उद्धव ठाकरेंना आव्हान

Crime News : गोळीबार प्रकरण: पंचवटी पोलिसांकडून १४वा संशयित जेरबंद, आतापर्यंत माजी नगरसेवकासह १४ अटकेत

World Cup 2025: भारताविरुद्ध पाकिस्तानने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल; हस्तांदोलन झालं की नाही?

Sangli Accident Death : काम संपवून घरी निघाला होता, समोरू दुचाकी आली अन् दोघेही जाग्यावर संपले; सांगलीतील घटना

Latest Marathi News Live Update:परबांनी बिल्डरांकडून मर्सिडीज घेतली की नाही, नार्को टेस्टही हवी : रामदास कदम

SCROLL FOR NEXT