Jaydev Unadkat Injury  
IPL

WTC फायनलपूर्वी रोहित अन् द्रविडची वाढली डोकेदुखी! IPL 2023 मध्ये घातक गोलंदाजाच्या खांद्याला दुखापत

टीम इंडियासाठी मोठी चिंतेची बाब...

Kiran Mahanavar

Jaydev Unadkat Injury : भारताला जूनमध्ये आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळायची आहे. त्यासाठी टीम इंडियाने संघाची घोषणाही केली आहे. यादरम्यान टीम इंडिया कर्णधार रोहित शर्मा आणि कोच राहुल द्रविडची चिंता वाढली आहे. याचे कारण म्हणजे कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात निवड झालेल्या खेळाडूची दुखापत. डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट जखमी झाला आहे. टीम इंडियासाठी ही मोठी चिंतेची बाब आहे.

जयदेव उनाडकट सध्या आयपीएल खेळत आहे. लखनौ सुपर जायंट्स संघाचा उनाडकट एक भाग आहे. लखनौने त्याला सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळायला दिले पण नंतर त्याला बेंचवर बसवले. या मोसमात त्याने तीन सामने खेळले आहेत, मात्र त्याला एकही बळी घेता आलेला नाही.

इंडियन प्रीमियर लीगने आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर उनाडकटचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये उनाडकटला दुखापत झाल्याचे दिसून येते. या व्हिडिओमध्ये उनाडकट गोलंदाजी करतो आणि चेंडू फेकल्यानंतर त्याच्या खांद्यावर पडतो. तो उठतो आणि खांद्याला पकडतो. उनाडकटच्या डाव्या खांद्याला दुखापत होणे ही चिंतेची बाब आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपला अजून एक महिन्याहून अधिक कालावधी बाकी आहे. अशा स्थितीत उनाडकटला दुखापतीतून पुनरागमन करण्याची संधी असेल. पण त्याची दुखापत किती गंभीर आहे यावर ते अवलंबून आहे. त्याच्या दुखापतीची स्थिती काय आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

उनाडकटने 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. त्यानंतर त्याला संधी मिळाली नाही. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बांगलादेश दौऱ्यावर त्याची कसोटी संघात निवड झाली आणि 12 वर्षांनंतर तो पुनरागमन करू शकला. त्याने मीरपूरमध्ये बांगलादेशविरुद्ध कसोटी सामनाही खेळला.

उनाडकटने आतापर्यंत आपल्या कारकिर्दीत भारताकडून केवळ दोन कसोटी सामने खेळले असून तीन विकेट घेण्यात तो यशस्वी ठरला आहे. त्याचबरोबर तो भारतासाठी सात एकदिवसीय सामने खेळला आहे. त्यामध्ये त्याने आठ विकेट्स घेतल्या आहेत. उनाडकटने भारतासाठी 10 टी-20 सामने खेळले असून 14 विकेट घेण्यात तो यशस्वी ठरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महात्मा गांधींच्या पुतळ्याला भाजपची टोपी, हातात पक्षाचा झेंडा; NDAच्या शिबिरात नेत्यांचा प्रताप, काँग्रेसचा हल्लाबोल

Maharashtra Politics : ३२ टक्के राजकारणी घराणेशाहीचे प्रतिक; ‘एडीआर’च्या अहवालातील महाराष्ट्राची स्थिती

Junnar News: 'ड्रंक अँड ड्राईव्ह आरोपींना आर्थिक दंडाबरोबर दोन वृक्ष लावण्याचा आदेश'; लोकन्यायालयातील पर्यावरणपूरक निर्णयाचे होतेय कौतुक

Pune News : पुण्यातील शेतकऱ्याच्या अनोख्या आंदोलनाची चर्चा; तीन वेळा आमरण उपोषण करूनही दखल नाही, आता थेट कारवरच...

IND vs PAK Asia Cup 2025: पहलगाम हल्ल्यानंतर युद्ध केलंत, तेही नीट केले नाही, मागे हटायला...; पाकिस्तानी खेळाडूचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT