Hardik Pandya Rohit Sharma
Hardik Pandya Rohit Sharma  esakal
IPL

IPL 2024 Hardik Pandya : मुंबई इंडियन्समध्ये माजली दुफळी... टीम रोहित अन् हार्दिक पांड्याचा वेगळा गट?

अनिरुद्ध संकपाळ

Two Fraction In Mumbai Indians Team : मुंबई इंडियन्सने आयपीएल 2024 च्या हंगामाची खराब सुरूवात केली आहे. त्यांनी आपले पहिले दोन्ही सामने गमावले असून ड्रेसिंग रूममध्ये दोन गट पडले असल्याचे वृत्त समोर आले आहे. मुंबईला अजून संपूर्ण हंगामाला सामोरे जायचे आहे. आता संघ हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकत्र येत आपली कामगिरी उंचावतो का हे पहावे लागेल.

मुंबई इंडियन्सचा सनराईजर्स हैदराबादने 31 धावांनी पराभव केला. हैदराबादने आयपीएल इतिहासातील सर्वात मोठी 277 ही धावसंख्या उभारली होती. त्यानंतर मुंबईनेही जोरदार प्रयत्न करत 246 धाावांपर्यंत मजल मारली. मात्र हैदराबादचे टार्गेट मुंबईच्या आवाक्याबाहेर राहिलं.

मुंबईच्या सलग दुसऱ्या पराभवामुळे नवा कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. मैदानावर मुंबईच्या गोलंदाजींनी 277 धावांची खैरात वाटली. मैदानाबाहेर बोलायचं झालं तर दैनिक जागरणने दिलेल्या वृत्तानुसार मुंबई इंडियन्समध्ये दोन गट पडले आहे. टीम रोहित शर्मा आणि टीम हार्दिक पांड्या!

रोहित शर्मा हा हार्दिक पांड्याकडे नेतृत्व दिल्याने नाराज आहे. रोहित हा सध्या भारतीय संघाचा तीनही फॉरमॅटमधील कर्णधार आहे. मुंबई इंडियन्सच्या या निर्णयामुळे तो फार खुश झालेला नाही. संघात असंतोष असून त्यामुळे ड्रेसिंग रूममध्ये दोन गट पडले आहेत.

रोहित शर्मा विरूद्ध हार्दिक पांड्या

जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि इतर खेळाडू हे रोहित शर्माच्या गटात आहेत. तर इशान किशन आणि इतर काही खेळाडू हे हार्दिक पांड्याला समर्थन देत आहेत. संघात दुफळी निर्माण झाल्याने संघाच्या एकसंधतेवर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे संघाची कामगिरी देखील प्रभावित होत आहे.

मैदानावर अन् मैदानाबाहेरही हार्दिक टार्गेट

मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला कर्णधार करण्याच्या निर्णयावर चाहत्यांनी प्रचंड रोष व्यक्त केला. मुंबई इंडियन्सचा हा निर्णय चाहत्यांना नाकारला असून अहमदाबादमधील चाहत्यांनी पांड्याचे हुटिंगने स्वागत केलं. पांड्याने अहमदाबाद फ्रेंचायजी सोडण्याचा राग चाहत्यांनी व्यक्त केला हे समजू शकतो.

मात्र हैदराबादविरूद्धच्या सामन्यात देखील हार्दिक पांड्याला अशाच प्रकारच्या हुटिंगचा सामना करावा लागला होता. त्यात भरीस भर म्हणून सामना हरल्यानंतर नेटकऱ्यांनी देखील हार्दिक पांड्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं. ट्रोलिंग करताना सभ्यतेची पातळी काही ठिकाणी ओलांडली गेली. पांड्याबद्दलचा राग आयपीएल जसजसे पुढे सरकत आहे तसतसे अधिक वाढत आहे.

(IPL Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramesh Chennithala : मतदारांचा कल ‘इंडिया’ आघाडीकडे

Loksabha Election 2024 : मोदी, ठाकरे, गांधी, पवार यांचीच हवा

Election Commission : निवडणूक आयोगाकडून तंत्रज्ञानस्नेही कारभाराला प्राधान्य

Devendra Fadnavis : कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग नगरपर्यंत नेणार

Success Story : पोरीची जिद्दच लय मोठी! अपघातात हात गमावला तरी अनामता डगमगली नाही, बोर्डात मिळवले ९२ टक्के मार्क्स

SCROLL FOR NEXT