DC vs MI Yash Dhull IPL Debut ESAKAL
IPL

DC vs MI Yash Dhull : अर्जुन नाही तर U19 वर्ल्डकपमध्ये धुमाकूळ घालणारा फलंदाज करणार IPL पदार्पण

अनिरुद्ध संकपाळ

DC vs MI Yash Dhull IPL Debut : आयपीएलच्या 16 व्या हंगामातील 16 वा सामना हा दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आज अरूण जेटली स्टेडियमवर होत आहे. या सामन्यात मुंबईकडून सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आयपीएल पदार्पण करण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र दोन वर्षापासून आपल्या संधी वाट पाहत असलेल्या अर्जुन आधी 19 वर्षाखालील वर्ल्डकप जिंकून देणारा यश धुल दिल्ली कॅपिटल्सकडून आयपीएल पदार्पण करणार आहे.

दिल्ली आणि मुंबई यांच्यातील सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईकडून जोफ्रा आर्चर खेळणार नाही. तसेच स्टब्सच्या जागी रोहित शर्माने रिले मेरेडिथला संधी दिली आहे.

दुसरीकडे दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने आपल्या संघात काही बदल केले. खलील अहमद हा दुखापतग्रस्त झाल्याने त्याच्या जागी यश धुलला आयपीएल पदार्पणाची संधी मिळाली आहे. तर रिली रुसोच्या जागी मुस्तफिजूर रहमानला संघात घेण्यात आले आहे.

दिल्ली कॅपिटल्सची प्लेईंग 11 :

पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मनिष पांडे, यश धुल, रोव्हमन पॉवेल, लिलत यादव, अक्षर पटेल, अभिषेक पोरेल, कुलदीप यादव, नॉर्त्जे, मुस्तफिजूर रहमान.

इम्पॅक्ट प्लेअर : अमन खान, मुकेश कुमार, सर्फराज खान, प्रविण दुबे, इशांत शर्मा

मुंबई इंडियन्स प्लेईंग 11 :

रोहित शर्मा, इशान किशन, कॅमरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नेहल वधेरा, ऋतिक शोकीन, रिले मेरेडेथ, अर्शाद खान, पियुष चावला. जेसन हेहरनडॉर्फ

इम्पॅक्ट प्लेअर : ट्रिस्टन स्टब्स, टीम डेव्हिड, कुमार कार्तिकेय, अर्जुन तेंडुलकर, रमनदीप सिंग

(Sports Latest News)

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NavIC: आता भारतीयांना रस्ता गुगल मॅप्स नाही, तर'नाविक' सांगणार; सरकारची नेमकी योजना काय?

Narayangaon News : पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी; एक किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Mahadev Jankar : सरकार शक्तिपीठ महामार्गाला तरतूद करते, मात्र निवडणूक आश्वासनातील कर्जमाफीला तरतूद करत नाही

JDU Expelled Leaders: मोठी बातमी! निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षाकडून ११ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, कारण काय?

ICC Womens World Cup 2025 : ठरलं! भारत सेमीफायनलमध्ये अपराजित ऑस्ट्रेलियाशी भिडणार; द. आफ्रिकेला हरवत कांगारूं पाँइंट्स टेबलमध्ये अव्वल...

SCROLL FOR NEXT