RCB vs KKR esakal
IPL

RCB vs KKR : केकेआरने आरसीबीचा विजयी वारू रोखला; घरच्या मैदानावर दिली मोठ्या फरकाने मात

अनिरुद्ध संकपाळ

RCB vs KKR : कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर बेंगलोरचा 21 धावांनी पराभव करत आपली गाडी पुन्हा विजयी ट्रॅकवर आणली. केकेआरने आरसीबीसमोर विजयासाठी 201 धावांचे आव्हान ठेवले होतो. विराट कोहलीने दमदार अर्धशतक ठोकत पहिल्या 10 षटकातच आरसीबीला शंभरी गाठून दिली होती. त्यावेळी सामना अटीतटीचा होईल असे वाटले होते. मात्र केकेआरने सामन्यात जोरदार पुनरामन करत आरसीबीची फलंदाजीची तगडी फळी 179 धावात रोखली. वरूण चक्रवर्तीने 4 षटकात 27 धावा देत 3 बळी टिपले. तर सुयश शर्माने आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

आरसीबीने चिन्नास्वामी स्टेडियमवर अनेकवेळा 200 च्या पार धावसंख्या सहज चेस केली आहे. केकेआरने आजच्या सामन्यात 201 धावांचे आव्हान ठेवल्यावर देखील आरसीबी ही धावसंख्या आरामात पार करेल असे वाटत होते. मात्र केकेआरच्या युवा सुयश शर्माने आरसीबीला पॉवर प्लेमध्येच बॅकफूटला ढकलले. त्याने फाफ ड्युप्लेसिस (17) आणि शाहबाज अहमदला (2) स्वस्तात माघारी धाडले.

यानंतर विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यावर आरसीबीचा डाव पुढे नेण्याची जबाबदारी होती. मात्र वरूण चक्रवर्तीने मॅक्सवेलची खेळी 5 धावातच संपवली. आरसीबीची अवस्था 3 बाद 58 धावा अशी झाली. दुसऱ्या बाजूने विराट कोहली एकटा झुंजत होता. अखेर त्याला महिपाल लोमरोरची साथ लाभली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली. मात्र महिपाल 18 चेंडूत 34 धावा करून बाद झाला. दरम्यान, एकाकी झुंज देणाऱ्या विराटने अर्धशतक पूर्ण केले.

मात्र विराट कोहलीची ही 54 धावांची खेळी आंद्रे रसेलने संपवली. यानंतर केकेआरने सामन्यावर आपली पकड मजबूत करण्यास सुरूवात केली. दिनेश कार्तिकने 18 चेंडूत 22 धावा करत प्रतिकार केला. मात्र वरूण चक्रवर्ती, आंद्रे रसेल यांच्यापुढे आरसीबीच्या इतर फलंदाजांची डाळ शिजली नाही. अखेर आरसीबीचा डाव 20 षटकात 8 बाद 179 धावांवर संपला. केकेआरने या विजयाबरोबरच आपली चार पराभवांची मालिका खंडित केली. तसेच 6 गुण मिळवत गुणतालिकेत 7 वे स्थान पटकावले.

(Sports Latest News)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur News: '१५ दिवसांत केला प्रलंबित १७ हजार दाखल्यांचा निपटारा'; जन्म-मृत्यू विभागात कर्मचारी वाढवून, सुट्या रद्द करून कामात आणली गती

Pune Police : विद्यार्थ्यांमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलिसांचा शिक्षण संस्थांबरोबर विशेष उपक्रम

Latest Marathi News Update LIVE : “कात्रज-नवले पुलाचा नवा प्रकल्प; विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही – मंत्री उदय सामंत”

Heart Blockage: हार्ट ब्लॉकेज कमी करतात ‘या’ 3 भाज्या, डॉक्टरही देतात रोज खाण्याचा सल्ला

kolhapur kagal politics: मुश्रीफ -राजे गट एकत्र आल्यानंतर, मंडलिकांनी वेगळी चाल खेळली; संजय घाटगेंची भेट घेत केली बंद खोलीत चर्चा

SCROLL FOR NEXT