Virat Kohli Record X/IPL
IPL

Virat Kohli: चिन्नास्वामीवर कोहलीचा 'विराट' पराक्रम! CSKविरुद्ध अर्धशतक हुकलं, पण 'हा' पराक्रम करणारा बनला पहिलाच क्रिकेटर

Virat Kohli Record: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहलीने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध खेळताना आयपीएलमध्ये कोणालाही न जमलेला विक्रम करून दाखवला आहे.

Pranali Kodre

Virat Kohli Record: आयपीएल 2024 स्पर्धेत शनिवारी (18 मे) 68 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सामना होत आहे. या सामन्यादरम्यान बेंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहलीने मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे.

विराटने या सामन्यात 29 चेंडूत 47 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने 3 चौकार आणि 4 षटकार मारले. त्यामुळे त्याने एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळताना आयपीएलमध्ये 3000 धावा पूर्ण केल्या. तो आयपीएलमध्ये एकाच ठिकाणी 3000 धावा करणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे. असा विक्रम त्याच्याव्यतिरिक्त अन्य कोणाला करता आलेला नाही.

आयपीएलमध्ये एकाच ठिकाणी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराटच्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा आहे. रोहितने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर 2295 धावा केल्या आहेत.

आयपीएलमध्ये एकाच ठिकाणी सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

  • 3040 धावा - विराट कोहली (एम चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू)

  • 2295 धावा - रोहित शर्मा (वानखेडे स्टेडियम, मुंबई)

  • 1960 धावा - एबी डिविलियर्स (एम चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू)

  • 1623 धावा - डेव्हिड वॉर्नर (राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद)

विराटची गेलशी बरोबरी

विराटने 47 धावांच्या खेळीदरम्यान आयपीएल 2024 स्पर्धेत 700 धावांचा टप्पाही पार केला. विराटने आयपीएल 2024 मध्ये 14 सामन्यांत 708 धावा केल्या आहेत. विराटने एकाच आयपीएल हंगामात 700 धावा पार करण्याची ही दुसरी वेळ आहे.

यापूर्वी विराटने 2016 साली 973 धावा केल्या होत्या. त्यामुळे विराटने ख्रिस गेलच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. गेलनेही दोनवेळा आयपीएलमध्ये 700 धावांचा टप्पा पार केला आहे. गेलने 2012 मध्ये 733 धावा केल्या होत्या. तसेच 2013 मध्ये त्याने 708 धावा केल्या होत्या.

बेंगळुरुचे चेन्नईला 219 धावांचे लक्ष्य

या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 218 धावा केल्या. बेंगळुरुकडून विराट व्यतिरिक्त फाफ डू प्लेसिसने 39 चेंडूत 54 धावांची खेळी केली. तसेच रजत पाटिदारने 23 चेंडूत 41 धावा केल्या.

चेन्नईकडून शार्दुल ठाकूरने 2 विकेट्स घेतल्या. तसेच तुषार देशपांडे आणि मिचेल सँटेनर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT