Virat Kohli Yashasvi Jaiswal Tweet Controversy
Virat Kohli Yashasvi Jaiswal Tweet Controversy  esakal
IPL

Virat Kohli Yashasvi Jaiswal : विराटनं यशस्वीचं कौतुक करणारे ट्विट केले त्वरित डिलीट, नेटकरी म्हणतात...

अनिरुद्ध संकपाळ

Virat Kohli Yashasvi Jaiswal Tweet Controversy : राजस्थानच्या 21 वर्षाच्या यशस्वी जैसवालने कोलकाता नाईट रायडर्स विरूद्धच्या सामन्यात आयपीएलमधील सर्वात वेगवान अर्धशतक ठोकले. यशस्वीने 13 चेंडूत 50 धावा ठोकत केकेआरच्या गोलंदाजांचा चांगलाच चुराडा केला. यानंतर यशस्वीने 47 चेंडूत नाबाद 98 धावा करत आपल्या संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. राजस्थानने केकेआरचे 150 धावांचे आव्हान 13.1 षटकातच पार करत दमदार विजय मिळवला.

या विजयानंतर भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने उत्साहात यशस्वी जैसवालचे तोंडभरून कौतुक करणारे ट्विट केले. विराट कोहली आपल्या ट्विटमध्ये म्हणतो की 'खूप छान! अशी सर्वात चांगली फलंदाजी मी बऱ्याच दिवसांनी पाहिली. यशस्वी जैसवालमध्ये काय गुणवत्ता आहे.'

तसं पाहिलं तर या ट्विटमध्ये आक्षेपार्ह असं काहीच नाही. उलट एका वरिष्ठ खेळाडूने युवा खेळाडूचा जरी तो प्रतिस्पर्धी संघातील असला तरी त्याचे कौतुक करणे हे चांगले लक्षण आहे. मात्र विराटने संदेश लिहिण्यात कोणती चूक केली नाही तर फोटो निवडण्यात त्याच्याकडून एक गफलत झाली.

विराट कोहलीने यशस्वी जैसवालचा जो फोटो या ट्विटला जोडला होता. त्यावर जिओ सिनेमाचा लोगो होता. विराट कोहली हा स्टार स्पोर्ट्सशी करारबद्ध आहे. या फोटोमुळे विराट कोहलीचा हा करार धोक्यात आला आसता. त्यामुळे विराट कोहलीने जुने ट्विट डिलीट करून नवे जिओ सिनेमाचा लोगो नसलेला फोटो लावत ट्विट केले.

विराट कोहलीने केलेली गफलत नेकऱ्यांच्या नजरेतून कुठे सुटते. त्यांनी लगेच विराटची ही गोष्ट पकडली आणि त्यावर सोशल मीडियाद्वारे प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली. एका नेटकऱ्याने 'कोहलीचा स्टार स्पोर्ट्सशी केलेला करार धोक्यात आला.' अशी प्रतिक्रिया दिली. तर दुसऱ्या नेटकऱ्याने 'विराट कोहलीने जिओ सिनेमाचे प्रमोशन केले.' अशी प्रतिक्रिया दिली.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Praful Patel : ''होय, 2004 पासून भाजपशी युती व्हावी म्हणून मी आग्रही होतो'', प्रफुल्ल पटेलांनी सगळाच इतिहास काढला

SRH vs PBKS Live Score : अभिषेक-क्लासेनची शानदार खेळी, हैदराबाद विजयासह प्लेऑफमध्ये; मात्र पंजाबची पराभवासह सांगता

Farooq Abdullah: फारुख अब्दुल्लांच्या सभेत चाकूहल्ला; 3 कार्यकर्ते जखमी, दोघांची स्थिती गंभीर

काँग्रेसमध्ये धुसफूस! मल्लिकार्जुन खरगेंच्या फोटोला काळे फासले, अधीर रंजन चौधरींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कार्यकर्ते नाराज

जम्मू काश्मीरमध्ये लोकसभेच्या मतदानापूर्वी दहशतवाद्यांचा हल्ला! भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू, तर एक दाम्पत्य जखमी

SCROLL FOR NEXT