virat kohli reaction after wicket punjab kings viral SAKAL
IPL

VIDEO: कोहली माणसावर नाही तर 'देवावर' नाराज; आकाशात पाहिल्यानंतर म्हणाला...

विराट कोहली ज्या प्रकारे फॉर्ममध्ये येण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. ते पाहून कुणाचेही हृदय तुटलं.

Kiran Mahanavar

विराट कोहली म्हणा किंवा 'किंग कोहली' आज कोणत्याही परिचयाची गरज त्याला नाही. भारताचा हा दिग्गज खेळाडू आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या वाईट टप्प्यातून जात आहे. यात काही शंका नाही की कोहली आता फॉर्ममध्ये नाही. पण हा चॅम्पियन फलंदाज ज्या प्रकारे फॉर्ममध्ये येण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. ते पाहून कुणाचेही हृदय तुटलं. एकेकाळी नवनवीन पद्धतीने धावा करणारा विराट कोहली आयपीएलमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आऊट होताना दिसत आहे. पंजाब किंग्जविरुद्धच्या शुक्रवारीच्या सामन्यात कोहली काहीसा उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत होता. त्याने लाँग ऑनवर षटकार तसंच कव्हर ड्राईव्हवर चौकार ठोकला होता, पण चौथ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याच्या दुर्दैवाने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता पाहिला लागला.(Virat Kohli Reaction After Wicket Punjab Kings Viral)

पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात विराट कोहली पूर्ण लयमध्ये फलंदाजी करताना दिसला. बाद होण्यापूर्वी विराट कोहली 13 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 20 धावांवर खेळत होता. डावाच्या चौथ्या षटकात गोलंदाजीसाठी आलेल्या कागिसो रबाडाने दुसरा चेंडू कोहलीच्या कंबरेला लागला आणि शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने उभ्या असलेल्या राहुल चहरच्या हातात गेला. पंचांनी कोहलीला नाबाद घोषित केले, पण पंजाबने डीआरएसची मागणी केली. थर्ड अंपायरलाने कोहलीला बाद घोषित केले. विराट कोहली आकाशाकडे पाहतो आणि तो जोरात ओरडतो, विराट कोहलीकडे बघून जणू काही वाटत होत तो देवाला काय तरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. कोहलीची अशी प्रतिक्रिया बघून चाहत्यांची मनंही तुटली आहे. एका चाहत्याने तर 'हे दुःख संपत नाही' अशी प्रतिक्रिया देत कोहलीला संघाबाहेर बसण्याचा सल्लाही दिला.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर पंजाब किंग्जने प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर २०९ धावांची मजल मारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना आरसीबीला 20 षटकांत 9 गडी गमावून 155 धावाच करता आल्या. पंजाबने हा सामना 54 धावांनी जिंकून प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहे .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ITR Return : आयकर विभागाचा करदात्यांना इशारा! 31 डिसेंबरनंतर थेट 5,000 दंड; ITR मध्ये चूक असेल तर आत्ताच हे करा

Latest Marathi News Live Update : मूदखेड तालुक्यातील जवळा मुरार येथे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

Tulsi Puajn Diwas 2025: आज तुळशी पूजनाचा खास दिवस! ‘हे’ उपाय केल्यास घरात नांदेल सुख-समृद्धी

Satara Crime: इन्स्टाग्रामवरील मैत्री आली अंगलट! कास पठार फिरवण्याच्या बहाण्याने बोलवलं अन् नंतर असं काही घडलं की...

Viral Memes : कोल्ड प्ले किस, महाकुंभ मोनालीसा ते इंडियन बजेटपर्यंत...2025 वर्षांत व्हायरल झाले टॉप 10 मिम्स, हसून हसून पोट दुखेल

SCROLL FOR NEXT