T-20 World Cup Team India Squad Virat Kohli News Marathi sakal
IPL

Team India Squad WC 2024 : विराट कोहली खेळणार टी-20 वर्ल्ड कप; मात्र 'या' स्टार खेळाडूबाबत सस्पेन्स

T-20 World Cup Team India Squad Virat Kohli : आयपीएलपूर्वी टी-20 वर्ल्ड कपसाठी विराट कोहली टीम इंडियामध्ये फिट होईल की नाही, याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते.

Kiran Mahanavar

T-20 World Cup Team India Squad Virat Kohli : आयपीएलपूर्वी टी-20 वर्ल्ड कपसाठी विराट कोहली टीम इंडियामध्ये फिट होईल की नाही, याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. इंडियन प्रीमियर लीगमध्ये तो आत्तापर्यंत केवळ 5 सामने खेळला असला तरी त्याने निदान आपल्या टीकाकारांना उत्तर दिले आहे.

यंदा आयपीएलमध्ये केवळ दोनच शतके झाली असून त्यात विराट कोहलीच्या नावाचा समावेश आहे. दरम्यान, विराट कोहलीचे टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचे तिकीट जवळपास निश्चित झाल्याची बातमी आहे, मात्र निवड समिती उर्वरित नावांवर नक्कीच चर्चा करत आहेत.

विराट कोहलीने यंदाच्या आयपीएलमध्ये पाच सामने खेळून 316 धावा केल्या आहेत. तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. या हंगामात कोहली व्यतिरिक्त फक्त जोस बटलरने शतक केले आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, उर्वरित नावांबाबत निवडकर्ते संभ्रमात आहेत. रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी सलामी दिली तर शुभमन गिलला कुठे बसवायचे हा मोठा प्रश्न आहे. शुभमन गिलने अद्याप आयपीएलमध्ये आपला फॉर्म दाखवलेला नाही ज्यासाठी तो ओळखला जातो.

युझवेंद्र चहल सध्या भारतीय संघाबाहेर असला तरी त्याचाही दावा आहे. राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याने आतापर्यंत 8 विकेट घेतल्या असून पर्पल कॅपच्या शर्यतीत तो दुसऱ्या स्थानावर आहे. वर्ल्ड कप संघातील इतर दावेदारांमध्ये कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांची नावे आहेत.

हे दोन्ही गोलंदाज फलंदाजीही करू शकतात, पण चहलही आपला दावेदार आहे. सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग आणि जसप्रीत बुमराह हे संघात असणे जवळपास निश्चित झाले आहे. मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग यांच्या नावाचाही समावेश आहे.

दरम्यान, आयपीएलमध्ये एलएसजीकडून खेळणारा मयंक यादव. जो सतत 150 किलोमीटर प्रतितास वेगाने गोलंदाजी करू शकतो, परंतु गेल्या सामन्यात त्याला दुखापत झाली आणि केवळ एक षटक टाकल्यानंतर त्याला परत जावे लागले. मात्र, बीसीसीआयची निवड समिती त्याच्यावर सतत लक्ष ठेवून आहे.

मोहम्मद शमी हा वर्ल्ड कप खेळणार नाही हे जवळपास निश्चित झाले आहे, अशा परिस्थितीत जसप्रीत बुमराहचा जोडीदार म्हणून मयंक यादव चांगला पर्याय ठरू शकतो. पण त्याच्या फिटनेसचा मुद्दा आहे, ज्यावर बीसीसीआय नक्कीच लक्ष ठेवणार आहे. मात्र, अजूनही आयपीएल सुरू असून, खेळाडू कसे खेळतात, यावर त्यांच्या कामगिरीवर लक्ष ठेवले जाईल, त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Latest Marathi News Updates: शिवसेना नेत्या शायना एनसी यांनी उज्ज्वल निकम यांचे केले अभिनंदन

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचा मोठा दावा!

SCROLL FOR NEXT