IPL

RR vs DC IPL 2023 : राजस्थानच्या तिघांनीच गाठला दुहेरी आकडा तरी चेस करणाऱ्या दिल्लीला फुटलाय घाम

अनिरुद्ध संकपाळ

Rajasthan Royals Vs Delhi Capitals : आयपीएल 2023 च्या 11 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून राजस्थानला फलंदाजी करण्यास सांगितले. राजस्थानकडून फक्त तीनच फलंदाजांना दुेहरी आकडा पार करता आला. मात्र या तिघांनी मिळूनच दिल्ली कॅपिटल्ससमोर विजयासाठी 200 धावांचे मोठे आव्हान उभे केले. राजस्थानकडून जॉस बटलरने 79, यशस्वी जैसवालने 60 तर हेटमायरने 39 धावांची खेळी केली. दिल्लीकडून मुकेश कुमारने 2 बळी टिपले.

दिल्ली कॅपिटल्सने गुवाहाटीच्या स्टेडियमवर नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जैसवालने पहिल्याच षटकात डेव्हिड वॉर्नरला टेन्शन दिले. त्याने खलील अहमदच्या पहिल्याच षटकात 5 चौकार ठोकत 20 धावा वसूल केल्या. त्याने जॉस बटलरच्या साथीने पॉवर प्लेमध्ये 68 धावा ठोकल्या.

दरम्यान, 60 धावांवर बाद होण्यापूर्वी यशस्वी जैसवालने नवव्या षटकातच बटलरसोबत 98 धावांची सलामी दिली. जैसवालनंतर संजू सॅमसन (0) आणि रियान पराग (7) स्वस्तात माघारी गेले. मात्र डावाची सूत्रे सलामीवीर जोस बटलरने आपल्या हातात घेत संघाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने नेले. त्याने अर्धशतकी खेळी केली.

बटलर आणि हेटमारयने चौथ्या विकेटसाठी 29 चेंडूत 49 धावांची भागीदारी रचली. अखेर बटलरची 51 चेंडूत केलेली 79 धावांची खेळी मुकेश कुमारने 19 व्या षटकात संपवली. मात्र बटलरनंतर आलेल्या जुरेलने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत राजस्थानला 180 च्या पार पोहचवले.

यानंतर हेटमायरने शेवटच्या षटकाची षटकारने सुरूवात केली. मात्र पुढच्या दोन चेंडूवर एकएकच धावा झाल्या. तिसऱ्या चेंडूवर मात्र हेटमायरने षटकार खेचत 200 धावा टप्प्यात आणल्या. हेटमायरने 21 चेंडूत नाबाद 39 धावा ठोकत राजस्थानला 199 धावांपर्यंत पोहचवले.

(Sports Latest News)

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

Video : दगडाच्या काळजाची आई! पोटच्या नकोशा मुलीला रस्त्यावर टाकून गेली पळून; कुत्र्याने बाळाच्या...धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Bharatmala Scheme : भारतमाला योजनेला धक्का: सुरत-चेन्नई महामार्ग रद्द होण्याची शक्यता; नाशिकचे हजारो कोटींचे प्रकल्प अधांतरी

Latest Maharashtra News Updates : रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये गणेश मूर्ती घडवण्याचं काम जोमात

SCROLL FOR NEXT