Yuzvendra Chahal told anecdote About Andrew Symonds James Franklin esakal
IPL

IPL 2022 : सायमंड - फ्रँकलिनने चहलचे हात - पाय बांधले अन्...

सकाळ डिजिटल टीम

युझवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) नुकतेच राजस्थान रॉयल्सच्या ट्विटर हँडेलवरून शेअर केलेल्या व्हिडिओत मुंबई इंडियन्समध्ये (Mumbai Indians) असताना घडलेले किस्से सांगितले. चहलने अँड्र्यू सायमंड (Andrew Symonds) आणि जेम्स फ्रँकलिन (James Franklin) यांनी चहलसोबत केलेली मस्ती कोणत्या स्तरापर्यंत गेली होती याचा खुलासा केला. याचबरोबर युझवेंद्र चहलने त्याला 2013 मध्ये एका खूप दारू प्यायलेल्या खेळाडूंने 15 व्या मजल्यावरून कसे लटकवले होते हे देखील सांगितले.

युझवेंद्र चहलने मुंबई इंडियन्समध्ये असताना 2011 ला अँड्र्यू सायमंड आणि जेम्स फ्रँकलिन यांनी पार्टीदरम्यान काय केले होते याचा खुलासा केला. तो म्हणाला की, 'ही घटना 2011 मध्ये घडली. त्यावेळी मुंबई इंडियन्सने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. आम्ही सर्व चेन्नईच्या हॉटेलमध्ये पार्टी करत होतो. अँड्र्यू सायमंड खूप सारा 'फ्रुट ज्यूस' प्यायला होता. मी त्याच्या सोबत होतो. दरम्यान जेम्स फ्रँकलिन आणि त्याने माझे हात पाय बांधले. आता म्हणाले की तू स्वतःला सोडव. ते खूपच मस्तीच्या मूडमध्ये होते. त्यांनी माझ्या तोंडाला देखील चिकटपट्टी लावली आणि ते या सर्व गोष्टी विसरून देखील गेले. पार्टी संपली आणि सकाळ देखील झाली. ज्यावेळी सफाईसाठी हॉटेलमधील कर्मचारी आले, त्यावेळी त्यांनी मला पाहिले आणि माझी सुटका केली. त्यांनी विचारले की कधीपासून अशा अवस्थेत आहेस. मी त्यांना सांगितले की संपूर्ण रात्रीपासून मी असाच आहे.'

दरम्यान, पॉडकास्टच्या होस्टने चहलला विचारले की, सकाळी सायमंड आणि फ्रेंकलिन यांनी तुझी माफी मागितली का? यावर चहल म्हणाला की, माफी नाही मागितली मात्र ते इतका ज्यूस प्यायले होते की त्यांना स्वतःचे भानच राहिले नाही. त्यांना त्या रात्री काय घडलं हे माहिती देखील नाही. युझवेंद्र चहलने नुकतेच एक 2013 मधील मुंबई इंडियन्समध्ये असताना घडलेला किस्सा सांगितला. राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत आर. अश्विन (R. Ashwin), करूण नायर आणि युझवेंद्र चहलने कमबॅक स्टोरी अंतर्गत आपल्या स्टोरी सांगितल्या. यात युझवेंद्र चहलने मुंबई इंडियन्समध्ये असताना 2013 ला झालेला एक किस्सा सांगितला.

युझवेंद्र चहल म्हणाला की, 'मी ही स्टोरी कधी सांगितली नाही. आज ती सर्वांना माहिती होईल. मी कधी कोणासोबत हे शेअर केले नव्हते. मी ज्यावेळी 2013 ला मुंबई इंडियन्समध्ये होतो. त्यावेळी आमचा सामना बेंगलोरमध्ये होता. सामन्यानंतर एक गेट टुगेदर झाले होते. दरम्यान, एक खेळाडू खूप दारू प्यायला होता. मी त्याने नाव घेणार नाही. मात्र तो खूप दारू प्यायला होता. तो खूप वेळापासून माझ्याकडे पाहत होता. त्यानंतर त्याने मला बोलवले आणि बाहेर घेऊन गेला. त्यानंतर त्याने मला बाल्कनीमधून खाली लटकवले.'

चहल पुढे म्हणाला की, 'मी माझे हात त्याच्या गळ्याभोवती घट्ट धरून ठेवले होते. जर माझा हात सटकला असता तर मी 15 व्या मजल्यावरून खाली पडलो असते. दरम्यान, अनेक लोकं तिथं आली आणि त्यांनी परिस्थिती हाताळत माझी सुटका केली. माझी शुद्धच हरपली होती. त्यांनी मला पाणी दिले. तेव्हा मला लक्षात आले की आपल्याला किती जबाबदारीने वागले पाहिजे. ती अशी घटना होती ज्यातून मी थोडक्यात बचावलो होतो. थोडी जरी चूक झाली असती तर मी खाली पडलो असतो.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AC कोचच्या बाथरुममध्ये आढळला पाच वर्षांच्या मुलीचा मृतदेह....मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमध्ये खळबळ

Success story: गुन्हेगारीमुळे बदनाम होतं गाव! आता प्रत्येक घरामध्ये आहेत अधिकारी; नेमका बदल कसा झाला?

Latest Marathi News Updates : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्वच्छ सन्मान सोहळ्याला, उप मुख्यमंत्री अजित पवार उपस्थित

Crime News : जुने नाशिक मधील मसाज पार्लरवर पोलिसांचा छापा; देहविक्री व्यवसाय उघड, ५ महिलांची सुटका

Asia Cup 2025: भारताच्या ७ खेळाडूंचे आशिया चषक संघात पदार्पण; त्यापैकी पाच प्लेइंग इलेव्हनमध्ये नक्की दिसणार

SCROLL FOR NEXT