FIFA World Cup 2022 esakal
क्रीडा

Irani Football Players : इराणचा संघ अडचणीत; होणार कारवाई?

इराणच्या फुटबॉल संघाने आपल्याच देशाचे राष्ट्रगीत म्हणण्यास नकार दिला.

सकाळ डिजिटल टीम

फिफा वर्ल्डकपमधील ग्रुप B च्या पहिला सामना इंग्लंड आणि इराण यांच्यात झाला. हा सामना सुरू होण्यापूर्वीच वादग्रस्त ठरला. आता इराणचा संघ अडचणीत येणार असल्याचे फुटबॉलच्या महाकुंभात बोलले जात आहे. इराणच्या फुटबॉल संघाने आपल्याच देशाचे राष्ट्रगीत म्हणण्यास नकार देत देशात सुरू असलेल्या सरकारविरोधी आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.( Irani Football Players May Get Jailed Players Refuse To Sing National Anthem Anti Hijab Protest )

होऊ शकते मोठी कारवाई

शासनाविरोधात आवाज उठवल्याबद्दल खेळाडूंना कठोर कारवाईला सामोरे जावे लागू शकते. इराणच्या राजवटीने फुटबॉल खेळाडूंविरोधात अटक वॉरंट जारी केल्याचा दावा केला जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या सरकारला आव्हान दिल्याबद्दल, इराणी खेळाडूंना तुरुंगात टाकले जाऊ शकते, नजरकैदेत ठेवले जाऊ शकते.

तसेच, फुटबॉल बोर्ड स्वतःच बरखास्त केले जाऊ शकते, ज्यामुळे संघाला भविष्यातील कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेण्यापासून प्रतिबंधित केले जाऊ शकते. अशा अनेक शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा: गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

नेमकं काय आहे प्रकरण?

इराण हा गेल्या दोन महिन्यापासून देशांतर्गत आंदोलनाने पार हादरून गेला आहे. 16 सप्टेंबरला इराणच्या कुर्दिश वंशाच्या 22 वर्षीय माशा अमिनीचा पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू झाला होता. यानंतर इराणमध्ये आंदोलने सुरू आहेत. अमिनीला इस्लामिक रिपब्लिकच्या महिलांसाठीच्या ड्रेस कोडचा भंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. या ड्रेसकोडमध्ये हिजाब घालण्याची सक्ती आहे.

दरम्यान, या घटनेचा निषेध म्हणून काही इराणी खेळाडूंनी राष्ट्रगीत म्हणण्यास नकार दिला. याचबरोबर आंदोलनाला पाठिंबा म्हणून या खेळाडूंनी विजय साजरा करण्यास देखील त्यांनी नकार दिला आहे.

मागील वर्षीही असेच काहीसे घडले होते. संयुक्त अरब अमिरातीमध्ये झालेल्या T20 विश्वचषकादरम्यान असाच किस्सा घडला होता. क्रिकेट स्पर्धेच्या दोन महिने आधी तालिबानने काबूलवर कब्जा केला. या संघटनेने देशात शरिया कायदा आणि तालिबानी झेंडा लागू केला होता. पण अफगाणिस्तान क्रिकेट संघाने स्कॉटलंडविरुद्धच्या मैदानावर अफगाणिस्तानचा झेंडा हातात घेतला. तालिबानच्या निषेधार्थ, खेळाडूंनी सामन्यापूर्वी त्यांचे राष्ट्रगीत गायले. त्यावेळी सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Teacher Recruitment : 'राज्यात सरकारी-अनुदानित शाळांमध्ये तब्बल 18,500 नवीन शिक्षकांची भरती करणार'; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

Latest Maharashtra News Updates : मोटारसायकल चोराला अटक, तीन बाईक्स जप्त

उपमुख्यमंत्री शिंदेंनी कोणत्या अधिकाराखाली स्थगिती दिली? हायकोर्टाची विचारणा, बेकायदा इमारत प्रकरणी अडचणी वाढणार

Mahadevi Elephant : कोल्हापूरकरांच्या लढ्याला येणार यश? नांदणी मठाच्या 'महादेवी'साठी उच्चस्तरीय समिती घेणार निर्णय

Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार; ब्रह्मपुरी तालुक्यातील लाखापूर येथील घटना

SCROLL FOR NEXT