Ireland Defeat West Indies In T20 World Cup 2022 Qualifier Send Two Time World Champion Home  esakal
क्रीडा

WI vs IRE : दोन वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन विंडीजला आयर्लंडने बसवले घरी

अनिरुद्ध संकपाळ

Ireland Defeat West Indies In T20 World Cup 2022 Qualifier : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी 20 वर्ल्डकप पात्रता फेरीत आयर्लंडने दोन वेळच्या वर्ल्डचॅम्पियन वेस्ट इंडीजला पात्रता फेरीतच गारद केले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडीजने आयर्लंडसमोर 146 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान आयर्लंडने 17.3 षटकात 1 फलंदाजाच्या मोबदल्यातच पार करत विंडीजला तब्बल 9 गडी राखून मात दिली. आयर्लंडकडून पॉल स्टर्लिंगने सर्वाधिक 48 चेंडूत नाबाद 66 धावा केल्या. तर लॉरकेन टकरने 35 चेंडूत 45 धावा करत त्याला चांगली साथ दिली. आयर्लंडने सुपर 12 मध्ये प्रवेश केला असून ते ग्रुप 2 मध्ये दाखल झाले आहेत. या ग्रुपमध्ये भारताचा देखील समावेश आहे.

वेस्ट इंंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांची पॉवर प्लेमध्येच अवस्था 2 बाद 27 धावा अशी झाली होती. त्यानंतर लुईस आणि ब्रँडन किंगने डाव सावरत भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. मात्र ही जोडी ग्रेथ डॅनले लुईसला 13 धावांवर बाद करत फोडली. कर्णधार निकोलस पूरन देखील 13 धावांची भर घालून परता. अखेर अर्धशतकी खेळी करणाऱ्या ब्रँडन किंगने विंडीजला शतकी मजल मारून दिली.

मात्र रोव्हमन पॉवल 6 धावा करून बाद झाल्याने विंडीजला स्लॉग ओव्हरमध्ये आपली धावसंख्या वाढवण्यात अपयश आले. ओडेन स्मिथने 12 चेंडूत 19 धावा करत विंडीजला 146 धावांपर्यंत पोहचवले. ब्रँडन किंगने 48 चेंडूत नाबाद 62 धावांची खेळी केली. आयर्लंडकडून ग्रेथ डॅनलेने प्रभावी मारा करत 4 षटकात 16 धावा देत 3 फलंदाज टिपले. सिमी सिंग आणि बॅरीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

वेस्ट इंडीजचे 147 धावांचे आवाक्यातील आव्हान घेऊन मैदानावर उतरलेल्या आयर्लंडने धडाकेबाज सुरूवात केली. सलामीवीर पॉल स्टर्लिंग आणि अँड्र्यू बालबिर्नेने 7 षटकात 70 धावांचा टप्पा पार केला. यानंतर अकिल हुसैनने अँड्र्यूला 37 धावांवर बाद करत आयर्लंडला पहिला धक्का दिला. मात्र नाबाद अर्धशतकी खेळी करणाऱ्या स्टर्लिंगने लॉरकेन टकरसोबत दुसऱ्या विकेटसाठी नाबाद 77 धावांची भागीदारी रचत विंडीजचे 146 धावांचे आव्हान 17.1 षटकातच पार केले. स्टर्लिंगने नाबाद 66 तर टकरने नाबाद 45 धावांची खेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Shivajinagar Court attack: शिवाजीनगर कोर्टाबाहेरील हल्लेखोरांची ओळख पटली; पुणे पोलिसांकडून महत्त्वाचे अपडेट्स

Latest Marathi News Live Update : सोनं ३८०० रुपयांनी तर चांदी ९ हजारांनी घसरली

बापरे! चालत्या बाईकवर बसून एकाच हाताने घेतला भन्नाट कॅच; थक्क करणारा Video तुफान Viral

IPL 2027 Auction : बेन स्टोक्ससाठी ३ संघ बक्कळ पैसा ओतणार, तिघांच्या खिशात ४० कोटींपेक्षा जास्त रक्कम; कोण मारणार बाजी?

Shaktipeeth Expressway : शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीवरून खानापूर शेतकरी पोलिसांत जोरदार झटापट; पोलिसांनी काठी हातात घेताच शेतकऱ्यांनी दगडे घेतली...

SCROLL FOR NEXT