Ishan Kishan dropped  esakal
क्रीडा

Ishan Kishan dropped : 'मला संघात का नाही घेतलं?' इशानला डच्चु, 'नेहमीच...'

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात नव्या दमाच्या खेळाडूंनी जिंकलेल्या या मालिकेचं कौतूक होतंय. मात्र...

सकाळ डिजिटल टीम

Ishaan Kishan dropped out first one day fans mimes viral : भारतानं श्रीलंकेच्या विरुद्ध टी २० मालिका जिंकली आणि चाहत्यांनी संघावर कौतूकाचा वर्षाव केला. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात नव्या दमाच्या खेळाडूंनी जिंकलेल्या या मालिकेचं कौतूक होतंय. मात्र यासगळ्यात एका खेळाडूला डावलण्यात आले आणि सोशल मीडियावर वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली.

इशान किशनला श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी तरी वगळण्यात आले. त्याच्याऐवजी पुन्हा एकदा शुभमन गिलला संधी देण्यात आली. गिलनं शेवटच्या टी २० सामन्यात समाधानकारक कामगिरी केली होती. अर्थात तिला ती करावी लागणार होती. कारण त्यापूर्वी तो फ्लॉप झाला होता. अता पुन्हा संघात स्थान मिळावं यासाठी त्याला झगडावं लागणार होतं.

Also Read - या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

ईशानला सामन्यात स्थान न मिळाल्यानं सोशल मीडियावर मात्र वेगवेगळ्या मीम्सचा वर्षाव होताना दिसतो आहे. त्यामध्ये एकानं तर ईशानच्या आत्मचरित्राचा उल्लेख करुन आपण एवढी कामगिरी केली असताना टीममध्ये का घेतले गेले नाही असा प्रश्न संबंधित नेटकऱ्यानं विचारला आहे. ईशानच्या चाहत्यांना देखील त्यामुळे खूप वाईट वाटले आहे.

गुवाहाटीमध्ये सुरु असणाऱ्या श्रीलंकेच्या सामन्यात अनेक खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामध्ये इशानला डावलण्यात आल्यानं चाहते नाराज झाले आहेत. सुर्यकुमार यादवला देखील स्थान देण्यात आलेले नाही त्यावर देखील सोशल मीडियावर व्हायरल झालेले मीम्स लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

इशान हा रोहित शर्मासोबत ओपनिंग करणार होता. व्यवस्थापनानं सुर्यकुमारलाही विश्रांती दिल्यानं कित्येकांनी नाराजी व्यक्त केली आहे. जे खेळाडू चांगली कामगिरी करतात त्यांना फॉरमॅट चेंज होताच विश्रांती का देतात असा प्रश्न नेटकरी विचारु लागले आहेत. सोशल मीडियावर या मीम्सला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संविधानात बसेल ते मिळेल, कुणाच्या ताटातलं देणार नाही; मराठा आरक्षणावर फडणवीसांची प्रतिक्रिया, जरांगे म्हणाले, ताटच उरणार नाही

सभ्य रहा, नीट कपडे परिधान करा! भाडेकरू मुलींना घरमालकाचा सल्ला, रूममध्ये लावला CCTV कॅमेरा

Marathi News Live Updates : सरकारने आवश्यक ते निर्णय घेतलेत, शिष्टमंडळ जरांगेंकडे जाणार नाही : विखे-पाटील

Sainik Takli MIDC protest : सैनिक टाकळी एमआयडीसीविरोधात शिरोळमध्ये राडा; प्रशासनाच्या कार्यालयाचे गेट तोडले, काचा फोडल्या, पोलिस कर्मचारी जखमी

Duleep Trophy 2026: हा, मुलगा कमाल आहे! वैभव सूर्यवंशीच्या सांगण्यावरून DRS घेतला अन् सामन्यात ट्विस्ट आला Video Viral

SCROLL FOR NEXT