Ishan Kishan esakal
क्रीडा

Ishan Kishan : मोठी किंमत मोजावी लागणार... इशान किशनने पुन्हा केलं द्रविडच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष?

द्रविडच्या पत्रकार परिषदेनंतर इशानने सराव सुरू केला मात्र...

अनिरुद्ध संकपाळ

Ishan Kishan Rahul Dravid : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. या संघात इशान किशनला संधी देण्यात आलेली नाही. अफगाणिस्तानविरूद्धच्या टी 20 मालिकेपाठोपाठ इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी देखील इशान किशनला संधी न मिळाल्याने त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई झाली आहे अशी चर्चा सुरू झाली.

संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी इशानवर शिस्तभंगाची कारवाई झाली नसल्याचे सांगत त्याने मानसिक थकवा आल्याने ब्रेक मागितला होता. त्याने फिट झाल्यावर देशांतर्गत क्रिकेट खेळून संघात परतावे असा सल्ला देखील द्रविडने दिला होता.

त्यानंतर इशान किशन झारखंडच्या संघाकडून रणजी ट्रॉफी सामने खेळेल असे वाटले होते. मात्र इशान किशन सर्व्हिसेसविरूद्धच्या सामन्यात देखील खेळणार नाहीये. त्याने सलग तीन रणजी ट्रॉफी सामने मिस केले आहे. त्याने इंग्लंडविरूद्धच्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी लाल चेंडूवरील सरावाची उत्तम संधी गमावली आहे.

इशान किशनला इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी संधी मिळाली नाही. त्यानंतर इशान किशन आणि संघ व्यवस्थापनामध्ये दुरावा निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली. दरम्यान, संघात केएस भरत, ध्रुव जुरेल आणि केएल राहुल असे तीन विकेटकिपर निवडण्यात आले.

दरम्यान, इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार इशान किशनवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळेच त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्याने मानसिक थकवा आल्याचे सांगत ब्रेक घेतला आणि तो दुबईत पार्टी करताना दिसला होता.

राहुल द्रविडने मात्र हे वृत्त खोडून काढलं आहे. राहुल द्रविडच्या अफगाणिस्तानविरूद्धच्या टी 20 मालिकेदरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेनंतर इशान किशनने सराव करण्यास देखील सुरूवात केली होती.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारत महान देश, माझा मित्र तिथं टॉपचा नेता; शरीफ यांच्यासमोर ट्रम्पकडून PM मोदींचं कौतुक

Weather Update : 'मॉन्सून'बाबत महत्त्वाची अपडेट! महाराष्ट्रातील बहुतांश भागांतून पावसाची माघार; हवामान विभागानं काय सांगितलं?

ICC Womens World Cup 2025 : स्पर्धेत राहण्यासाठी टीम इंडिया स्ट्रॅटेजी बदलणार? दोन पराभवानंतर हरमनप्रीत कौरला कठोर निर्णय घ्यावेच लागणार...

Latest Marathi News Live Update : पुणेकरांची दिवाळी यंदा धूमधडाक्यात! फटाक्यांची दुकानं राहणार २४ तास खुली

Solapur News: 'शेतकऱ्यांचा माजी गृहराज्यमंत्र्यांच्या दारात टाहो'; दोन वर्षांपासून पाच कोटींची रक्कम थकवली, साेलापुरात बेमुदत उपोषण

SCROLL FOR NEXT