Jack Hobbs Cricketer
Jack Hobbs Cricketer  esakal
क्रीडा

Jack Hobbs : 50, 100 नाही तब्बल 199 शतकं! 'द मास्टर' सारखा कारनामा सचिन - विराटलाही जमला नाही

अनिरुद्ध संकपाळ

Jack Hobbs World Record : जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम हा सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे हे सर्वांना महितीच आहे. सचिन तेंडुलकरचे हा शतकांच्या शतकाचा विक्रम भारताचाच रनमशिन विराट कोहली मोडणार हे देखील सर्वांना माहिती आहे. हा झाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विषय! मात्र प्रथम श्रेणी क्रिकेटचा विचार केला तर सचिन तेंडुलकरचे शतकांच्या शतकांचे कौतुक फिके पडले अशी कामगिरी इंग्लंडच्या जॅक हॉब्ज यांनी केली आहे. त्यांच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम नोंदवला गेला आहे.

इंग्लंडच्या जॅन बेरी हॉब्ज, क्रिकेट जगतात जॅक हॉब्ज या नावाने ओळखल्या जाणाऱ्या फलंदाजाच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वाधिक शतकांचा विक्रम आहे. त्यांनी तब्बल 199 प्रथम श्रेणी शतके ठोकली आहेत. याचबरोबर प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम देखील त्यांच्याच नावावर आहे.

हॉब्ज यांनी आपल्या कारकिर्दीत एकूण 834 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी 50.70 च्या सरासरीने 61 हजार 760 धावा ठोकल्या. यात 199 शतकांचा देखील समावेश आहे. जगात अशी कामगिरी कोणत्याही दुसऱ्या खेळाडूला करता आलेली नाही.

हॉब्ज यांनी 46 व्या वर्षी ठोकले आंतरराष्ट्रीय शतक ठोकले. त्यांनी 46 व्या वर्षी इंग्लंडकडून कसोटी शतक ठोकले. ते जागतिक क्रिकेटमध्ये शतक ठोकणारे सर्वात बुजूर्ग फलंदाज ठरले. हॉब्ज हे वयाच्या 50 व्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळत राहिले. त्यामुळे त्यांना द मास्टर हे नाव देण्यात आले. याचबरोबत ते नाईट ही मानाची पदवी मिळवणारे पहिले व्यावसिक क्रिकेटपटू ठरले.

हॉब्ज यांच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी एकूण 61 सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी 5410 धावा केल्या आहेत. यात त्यांनी 15 शतकी खेळी देखील केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांची सरासरी 56.94 इतकी होती. 211 धावा ही त्यांची सर्वोच्च खेळी होती.

(Sports Latest News)

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT