James Anderson and Sachin Tendulkar Sakal
क्रीडा

अँडरसन! सचिन तेंडुलकरनंतर खास पराक्रम करणारा एकमेव 'हिरा'

सुशांत जाधव

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मैदानात उतरताच जेम्स अँडरसन याने खास विक्रमाला गवसणी घातली.

Australia vs England, 4th Test James Anderson Record : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना सिडनीच्या मैदानात सुरु आहे. The Ashes, 2021-22 च्या प्रतिष्ठित मालिकेतील सलग तीन विजयासह यजमान ऑस्ट्रेलियाने मालिका खिशात घातली आहे. उर्वरित दोन सामन्यात उरली सुरली अब्रु राखण्याचे मोठे आव्हान इंग्लंडसमोर आहे. एका बाजूला इंग्लंडला या दौऱ्यात मानहानिकारक पराभवाला जायला लागले असताना दुसऱ्या बाजूला इंग्लंडच्या अनुभवी जलदगती गोलंदाजाने खास विक्रम आपल्या नावे केला आहे. (James Anderson Record second most capped player in Test history after Sachin Tendulkar)

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मैदानात उतरताच जेम्स अँडरसन (James Anderson ) हा सर्वाधिक कसोटी सामना खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहचला. त्याच्या पुढे आता केवळ भारताचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरच आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar ) 200 कसोटी सामने खेळले आहेत. जेम्स अँडरसनचा हा 179 वा सामना आहे. गोलंदाज असून त्याने हा मैलाचा पल्ला गाठून दाखवलाय हे विशेषच.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात अँडरसनने पहिल्या दिवशी एक विकेट घेतली. या विकेटसह त्याच्या खात्यात आतापर्यंत कसोटीत 640 विकेट्सची नोंद झालीये. कसोटीमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा तो जलदगती गोलंदाज आहे. ऑलओव्हर विचार केल्यास कसोटीमध्ये सर्वाधिक विकेट्सचा विक्रम हा श्रीलंकन दिग्गज मुथय्या मुरलीधरनच्या नावे आहे.

मुरलीधरनने 133 सामन्यातील 230 डावात 800 विकेट घेतल्या होत्या. त्याच्यापाठोपाठ दुसरे नावही फिरकीपटूचेच आहे. ऑस्ट्रेलियन शेन वॉर्ननं 145 कसोटी सामन्यातील 273 डावात 708 विकेट घेतल्या आहेत. या दिग्गजापाठोपाठ अँडरसन तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत 169 सामन्यातील 313 डावात 640 विकेट्स घेतल्या आहेत. 600 + विकेट घेणारा तो एकमेव जलदगती गोलंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT