ICC Player Rankings Sakal
क्रीडा

ICC Player Rankings : आयसीसीच्या जून महिन्यातील बुमरा, मानधना ठरले सर्वोत्तम खेळाडू

ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेचा हिरो जसप्रीत बुमरा आणि सातत्यपूर्ण कामगिरी करत असलेली स्मृती मानधना आयसीसीच्या जून महिन्यातील आयसीसीचे सर्वोत्तम पुरुष आणि महिला खेळाडू ठरले.

सकाळ वृत्तसेवा

दुबई : ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेचा हिरो जसप्रीत बुमरा आणि सातत्यपूर्ण कामगिरी करत असलेली स्मृती मानधना आयसीसीच्या जून महिन्यातील आयसीसीचे सर्वोत्तम पुरुष आणि महिला खेळाडू ठरले.

भारतीय क्रिकेटसाठी हे दुहेरी यश आहे. असा सन्मान क्वचितच एका देशाला मिळाला आहे. बुमराला या अगोदरही हा मान मिळालेला आहे, स्मृती मानधना मात्र पहिल्यांदा आयसीसीच्या या मासिक पुरस्काराची मानकरी ठरली आहे. गेल्या महिन्यात झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत सलग दोन शतके करणाऱ्या स्मृतीचे तिसऱ्या सामन्यातीलही शतक थोडक्यात हुकले होते.

बुमराने ट्वेन्टी-२० विश्वकरंडक कमालीची गाजवली. १५ विकेट मिळवणारा बुमरा स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. आयसीसीकडून हा सन्मान मिळाल्याबद्दल मी आनंदी आहे. वेस्ट इंडीजमधील अभूतपूर्व यशानंतर हा सन्मान द्विगुणीत करणारा आहे, अशी भावना बुमराने व्यक्त केली. असाच आनंद मानधनानेही व्यक्त केला. या कामगिरीत सातत्य राखण्याचाही विश्वास तिने बोलून दाखवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकीला उपचारासाठी घेऊन आलेल्या बापाला महिला डॉक्टरनं मारली कानाखाली; सरकारी दवाखान्यातला VIDEO VIRAL

इलॉन मस्कने पुन्हा एकदा जगाला केलं शॉक! Wikipedia ला टक्कर देणार Grokipedia, कोणतं आहे बेस्ट? पाहा एका क्लिकवर

"तर आमची मैत्री तुटेल..." राज ठाकरेंसोबत सिनेमा बनवण्यावर महेश मांजरेकरांनी मांडलं मत; म्हणाले..

Latest Marathi News Live Update : हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेसचा पक्ष प्रवेश सोहळा

Hasan Mushrif : हसन मुश्रीफांचा सार्वजनिक बांधकाम विभागावर संताप, कामातील दिरंगाईवर अधिकाऱ्यांना खडे बोल

SCROLL FOR NEXT