Jay Shah Refuse To Waving Indian Flag After India Defeat Pakistan In Asia Cup 2022
Jay Shah Refuse To Waving Indian Flag After India Defeat Pakistan In Asia Cup 2022 esakal
क्रीडा

Video | Jay Shah : बीसीसीआय अध्यक्ष जय शहांनी तिरंगा हातात घेण्यास दिला नकार

सकाळ डिजिटल टीम

Jay Shah Asia Cup 2022 India Vs Pakistan : आशिया कपच्या हाय व्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव केला. शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात हार्दिक पांड्याने भारताला 3 चेंडूत 6 धावांची गरज असताना षटकार मारून सामना जिंकून दिला. यानंतर दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये एकच जल्लोष सुरू झाला. भारताचे चाहते या विजयाचे सेलिब्रेशन हातात तिरंगा घेऊन करत होते. मात्र बीसीसीआय अध्यक्ष जय शहा यांनी मात्र तिरंगा हातात घेऊन तो फडकवण्यास नकार दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा हे अभियान सुरू केले होते. मात्र त्यांच्याच मंत्रीमंडळात गृहमंत्री असलेल्या अमित शहा यांच्या मुलाने मात्र भारताने पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवला असताना देखील हातात तिरंगा घेऊन विजयाचा जल्लोष करणे टाळले. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरून जय शहा यांच्यावर टीका देखील होत आहे.

जय शहांचा हा व्हिडिओ शेअर करत प्रतिक पाटील यांनी ट्विट केले की, 'बीसीसीआयचा सचिव असलेल्या जय शहाने भारतीय राष्ट्रध्वज हातात घेण्यास आजच्या सामन्यात नकार दिला. आणि याचे वडील देशातील लोकांना देशभक्ती शिकवतात. Such a shame'

दरम्यान, भारताने आशिया कप 2022 मध्ये पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा 5 गडी राकून परभाव केला. भारताने पाकिस्तानचे 148 धावांचे आव्हान 5 फलंदाजांच्या मोबदल्यात 19.4 षटकात पार केले. भारताने ज्या मैदानावर वर्ल्डकप टी 20 चा सामना पाकिस्तानकडून हरला होता. त्यात मैदानावर पाकिस्तानला मात दिली. सामन्याचा हिरो हार्दिक पांड्या ठरला. त्याने भेदक मारा करत 3 विकेट घेतल्या तर फलंदाजीत 17 चेंडूत नाबाद 33 धावांची सामना जिंकून देणारी खेळी केली. त्याने भारताला विजयासाठी 3 चेंडूत 6 धावांची गरज असताना षटकार मारला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT