Jaydev Unadkat India vs Bangladesh Test Series sakal
क्रीडा

IND vs BAN: 'कोणत्याही पत्नीसाठी हा...' इंडियाची जर्सी मिळाल्याने जयदेव उनाडकटचा चेहरा फुलला

12 वर्षांपूर्वी कारकिर्दीतील एकमेव कसोटी सामना खेळणाऱ्या जयदेव उनाडकटचा संघात समावेश....

Kiran Mahanavar

Jaydev Unadkat India vs Bangladesh Test Series : बांगलादेशविरुद्ध बुधवारपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी बीसीसीआयने भारतीय संघात तीन मोठे बदल केले आहेत. कर्णधार रोहित शर्मा अंगठ्याच्या दुखापतीमुळे बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीतून बाहेर पडला असून त्याच्या अनुपस्थितीत राहुल संघाचे नेतृत्व करणार आहे. 12 वर्षांपूर्वी कारकिर्दीतील एकमेव कसोटी सामना खेळणाऱ्या भारतीय संघात डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटचाही समावेश करण्यात आला होता.

मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून बाहेर पडले आहेत. दुखापतग्रस्त मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजाच्या जागी वेगवान गोलंदाज नवदीप सैनी आणि नवोदित सौरभ कुमार यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. भारतीय संघात पुनरागमन झाल्याने उनाडकट आनंदी आहे. जयदेवने भारतासाठी 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्कमध्ये एकमेव कसोटी खेळली होती.

पहिल्या कसोटीत चांगली कामगिरी न केल्यामुळे टीम इंडियानं नंतर दुर्लक्ष केल्यामुळे जयदेव उनाडकटला संधी मिळाली नाही. तरी जयदेवने आशा सोडली नाही आणि त्याला 12 वर्षांपासून संघात समाविष्ट केले आहे.

बीसीसीआयने रविवारी संघात त्याचे स्थान निश्चित केल्यानंतर जयदेव उनाडकटच्या पत्नीने सोशल मीडियावर जयदेवचा भारतीय जर्सी परिधान केलेला फोटो शेअर केला. पोस्ट शेअर करताना त्याने लिहिले, "कोणत्याही पत्नीसाठी हा गर्वाचा क्षण आहे."

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ : लोकेश राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, केएस भरत, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव , शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, उमेश यादव, अभिमन्यू इसवरन, नवदीप सैनी, सौरभ कुमार, जयदेव उनाडकट.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Frank Caprio : प्रसिद्ध अमेरिकन न्यायाधीश फ्रँक कॅप्रियो यांचे निधन, वयाच्या ८८ व्या वर्षी घेतला अखेचा श्वास

Yavatmal Accident: शिक्षकांना ने-आण करणाऱ्या ट्रॅव्हलरला ट्रकची धडक; १२ शिक्षक जखमी, चार गंभीर, जीवितहानी नाही

सोलापुरात रोखले १५१ बालविवाह! मेच्या उन्हाळी सुटीत सर्वाधिक बालविवाह; आता बालविवाह जमविणारे, विवाहाला आलेले व विवाह लावणाऱ्यांना होणार ‘एवढी’ शिक्षा

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात घरच्या घरी बनवा स्प्राउट अन् पनीर कबाब, सोपी आहे रेसिपी

Manoj Jarange: मनोज जरांगे पुन्हा मैदानात; २९ ऑगस्टपासून मुंबईत उपोषणाचा निर्धार, मांजरसुंबा येथे अंतिम इशारा सभा

SCROLL FOR NEXT