Jofra Archer 
क्रीडा

Jofra Archer: विकेटचा षटकार! MI च्या वाघाने केली अर्धा आफ्रिकन संघाची शिकार

30 वर्षांच्या जुन्या विक्रमाला लावली आग....

Kiran Mahanavar

Jofra Archer : दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका यजमानांनी 2-1 ने जिंकली. मालिकेतील तिस-या सामन्यात जोफ्रा आर्चरने 6 विकेट्स घेऊन जागतिक क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्याचे संकेत आहेत. त्याची मॅचविनिंग कामगिरी पाहिल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या संघाला नक्कीच मोठा दिलासा मिळाला असणार आहे.

या मालिकेतील पहिल्या 2 सामन्यातील पराभवानंतर इंग्लंड संघावर क्लीन स्वीपचा धोका निर्माण झाला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने कर्णधार जोस बटलर आणि डेव्हिड मलान यांच्या शतकी खेळीमुळे 346 धावा केल्या. यानंतर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला जोफ्रा आर्चरच्या शानदार गोलंदाजीचा सामना करावा लागला.

मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात 1 विकेट घेतल्यानंतर जोफ्रा आर्चरला दुसऱ्या वनडेच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले नाही. यानंतर तिसऱ्या सामन्यात पुनरागमन करत जोफ्राने आपल्या जुन्या गोलंदाजीची धार सर्वांना दाखवून दिली. या सामन्यात जोफ्राने आपल्या गोलंदाजीत 9.1 षटकात एकूण 6 विकेट्स घेतल्या.

दक्षिण आफ्रिकेतील 30 वर्षे जुना विक्रम मोडला. एकदिवसीय सामन्यात कोणत्याही परदेशी गोलंदाजाने केलेली सर्वोत्तम कामगिरी म्हणून नोंदवली गेली आहे. या प्रकरणात त्याने वसीम अक्रमचा 30 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. अक्रमने 1993 मध्ये दक्षिण आफ्रिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 16 धावांत 5 विकेट्स घेतल्या होत्या.

2019 मध्ये इंग्लंडला विश्वचषक जिंकून देण्यात जोफ्रा आर्चरचा मोलाचा वाटा होता. त्याने आयपीएलमध्ये 35 सामन्यात 46 विकेट घेतल्या आहेत. जोफ्रा आर्चरच्या एकूण टी-20 विक्रमावर नजर टाकली तर त्याने 118 डावात 153 विकेट घेतल्या आहेत. 18 धावांत 4 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

जसप्रीत बुमराह आधीपासूनच मुंबई इंडियन्समध्ये आहे. अशा परिस्थितीत आर्चर त्याचा गोलंदाजीचा साथीदार बनू शकतो. या दोन्ही खेळाडूंची आठ षटके खेळणे कोणत्याही संघाला सोपे जाणार नाही. हे खेळाडू डावाच्या सुरुवातीला किलर्स बॉलिंग करतात आणि खूप किफायतशीर ठरतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar oath ceremony : नितीशकुमार आज बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची दहाव्यांदा शपथ घेणार, मोदींची 'ग्रँड एन्ट्री' होणार!

Satara Politics: काहींना न्याय देऊ शकलो नाही: खासदार उदयनराजे भोसले; नाराज असलेल्याबाबत नेमकं काय म्हणाले?

अग्रलेख : पहिल्या घासाला खडा

Horoscope Prediction : आज धनयोग + सर्वार्थ सिद्धी योग! 'या' 5 राशींना होणार धनलाभ अन् भगवान विष्णू अनेक अडचणी दूर करणार!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 20 नोव्हेंबर 2025

SCROLL FOR NEXT