Jonny Bairstow Broke Leg In Three Places successful surgery esakal
क्रीडा

Jonny Bairstow : बेअरस्टोचा तीन ठिकाणी मोडला पाय; 2023 पर्यंत काही मैदानावर येत नाही

अनिरुद्ध संकपाळ

Jonny Bairstow Injury Update : इंग्लंड क्रिकेट संघाचा फलंदाज व विकेटकिपर जॉनी बेयरस्टो हा दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी 20 विश्वचषक मालिकेमधून बाहेर गेला आहे. त्याच्या पायाला तीन जाग्यावर फ्रॅक्चर झाले आहे. याची माहिती बेयरस्टो ने सोशल मीडीयावर पायाचे फोटो शेयर करत केली आहे. वर्ल्डकप संघात निवड झाली असताना त्याला ही दुखापत गोल्फ खेळताना झाली. त्यामुळे इंग्लंडला आपल्या वर्ल्डकप संघात बदल करावा लागला होता. आता तो 2023 शिवाय फिट होणार नाही असे संकेत मिळत आहेत.

कशी झाली दुखापत

इंग्लंड चा फलंदाज जॉनी बेयरस्टो याने दुखापतीचे गांभीर्य सांगितले. त्याच्यामुळे तो ऑस्ट्रेलियामध्ये होणारा टी20 विश्वचषक खेळू शकणार नाही. एका महिन्यापूर्वी गोल्फ खेळताना त्याच्या डाव्या पायाला दुखापत झाली होती व त्याचा घोटा ट्विट्स झाला होता. त्याच्या पायाला तीन ठिकाणी फ्रॅक्चर होते. तेथे प्लेट लावाव्या लागल्या आहेत. दुखापतीनंतर जवळपास एका आठवड्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तोल सांभळण्याच्या नादात तो पडला त्याच्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली.

टी20 विश्वचषकासाठी इंग्लंड संघ

जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, एलेक्स हेल्स, हैरी ब्रुक, सैम करन, क्रिस जॉर्डन, लियाम लिविंगस्टोन, डेविड मलान, आदिल राशिद, फिल साल्ट, बेन स्टोक्स, रीस टॉप्ली, डेविड विली, क्रिस वोक्स आणि मार्क वुड.

स्टँड बाय प्लेयर: टायमल मिल्स, लियाम डॉसन आणि रिचर्ड ग्लीसन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT